पाटणा, 6 जुलै : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद प्रमुख लालू प्रसाद यादव
(Lalu Prasad Yadav) यांची गेल्या काही दिवसांपासून ढासळत आहे. त्यांना मंगळवारी संध्याकाळी पाटण्यातील पारस रुग्णालयातून बाहेर काढून दिल्लीला नेण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत मुलगी मीसा भारती आणि मोठा मुलगा तेज प्रताप यादव उपस्थित होते. त्याचवेळी तेजस्वी यादव, पत्नी राजश्री आणि राबडी देवी आधीच दिल्लीत पोहोचले आहेत.
मुलीकडून भावुक पोस्ट
लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी यांनी वडिलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासोबतच त्यांनी एक भावुक पोस्टही लिहिली आहे. यासोबतच लालू यादव यांचे इतर फोटोही समोर आले आहेत, ज्यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार लालूंची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. त्यांनी काही छायाचित्रे शेअर केली आणि लालू यादव यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आरजेडी सुप्रीमो लालू यादव (Lalu Yadav) यांना चांगल्या उपचारासाठी पाटण्याहून दिल्लीत आणण्यात आले आहे. येथे त्यांच्यावर एम्स (AIIMS) रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी लालू यादव यांची दिल्ली विमानतळावर भेट घेतल्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. सोरेन यांनी लालूंची कन्या मीसा भारती यांच्या भेटीचा उल्लेखही केला आहे. मुख्यमंत्र्यांनी लिहिले, की दिल्लीहून रांचीला जाण्यासाठी दिल्ली विमानतळावर आरजेडी सुप्रीमो आदरणीय लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. त्यांनी त्यांच्यासोबत असलेल्या मीसा भारती यांच्याकडून लालूजींच्या प्रकृतीची विचारपूस केली. आदरणीय लालूजींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी शुभेच्छा देतो.
नितीश यांनीही घेतली भेट
विशेष म्हणजे आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार देखील लालूंची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत. नितीश यांनी लालूंना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सीएम नितीश म्हणाले की, मी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांची पाटणा येथील पारस हॉस्पिटलमध्ये भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. लालू प्रसाद यादव यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा. लालूंच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार असल्याची घोषणा नितीश कुमार यांनी केली आहे.
...म्हणून डॉ. गुरप्रीतशी पन्नाशीत लग्न; CM मान यांच्या दुसऱ्या लग्नाचं कारण समोर
पीएम मोदींनी आरोग्याची माहिती घेतली
मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस्वी यादव यांच्याशी फोनवर चर्चा करून लालू यादव यांची प्रकृती जाणून घेतली. तेजस्वी यादव यांनी बुधवारी लालू यादव यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, त्यांच्या वडिलांच्या किडनी आणि हृदयावर पहिल्यापासून दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. तिथल्या डॉक्टरांना त्याच्या वैद्यकीय इतिहासाची माहिती आहे. पुढील उपचारासाठी आम्ही त्यांना दिल्लीला नेणार आहोत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तेजस्वी यादव यांनी सांगितले की, मंगळवारी पंतप्रधान मोदींचा फोन आला होता. आम्ही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशीही बोललो. लालूजी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना सर्वजण करत आहेत.
लालू यादव पायऱ्यांवरून पडले होते
लालू रविवारी माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांचे शासकीय निवासस्थान 10, सर्कुलर रोड येथील पायऱ्यांवरून पडले होते. त्यामुळे त्यांचा उजवा खांदा फ्रॅक्चर झाला आणि पाठीलाही दुखापत झाली. रविवारी खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून लालू घरी परतले होते. मात्र, सोमवारी पहाटे 3 वाजता त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पाटणा येथील पारस येथे दाखल करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.