लोकचळवळ झाल्याशिवाय विकास शक्य नाही - रविशंकर प्रसाद

लोकचळवळ झाल्याशिवाय विकास शक्य नाही - रविशंकर प्रसाद

भारतात डिजिटल क्रांती ही लोकचळवळ झाली आहे. लोकचळवळ झाल्याशिवाय विकास शक्य नाही, असं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले. न्यूज18 नेटवर्कच्या रायझिंग इंडिया 2019 या परिषदेत ते बोलत होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : "महाआघाडीकडे आणि कुणीच विरोधकांकडे नेतृत्व करू शकेल असा चेहरा नाही. पंतप्रधानपदी कुणाचा चेहरा आहे तुम्ही सांगा - अखिलेश, मायावती, ममता, शरद पवार ... मला नाही वाटत कुणाकडे जनता त्या अर्थाने पाहू शकते. आमच्याकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे समर्थ नेतृत्व आहे, असं रविशंकर प्रसाद म्हणाले.  नेता नाही, नेतृत्व नाही आणि धोरणही नाही. लोक त्यांच्यावर कसा विश्वास ठेवणार. आमच्याकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे समर्थ नेतृत्व आहे." न्यूज18 नेटवर्कच्या रायझिंग इंडिया 2019 या परिषदेत ते बोलत होते.

प्रत्येक नव्या आघाताबरोबर भारत कमकुवत न होता उलट अधिकाधिक प्रबळ होत आहे आणि पुलवामा हल्ल्यानंतर विरोध विसरून एकत्र येत निषेध करणाऱ्या भारतीयांनी दाखवून दिलं आहे आणि आता त्यालाच सुसंगत वेगवेगळ्या विचारसरणीचे, वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे तज्ज्ञ, नेते, कलाकार यांना एका मंचावर आणून देशाच्या विकासावर चर्चा घडवून आणायचं काम न्यूज18 नेटवर्क करत आहे.

डिजिटल इंडियाच्या यशाविषयी बोलताना रविशंकर प्रसाद यांनी मोदी सरकारच्या धोरणांमुळे टेलिकम्युनिकेशमध्ये निकोप स्पर्धा सुरू झाली, असं सांगितलं. "आयकर परतावा भरणाऱ्यांमध्ये वाढ झाली. डिजिटल पॉवर वाढली, शौचालयं बांधली गेली. त्यामुळे विकास आणि वाढ यांचा समतोल साधला गेला आहे", असा दावा रविशंकर प्रसाद यांनी केला.

"भारतात सगळ्यांचं स्वागत आहे. पण त्यांनी इथले नियम पाळले पहिजेत. फेसबुकसारख्या कंपन्यांनी डेटाचा गैरवापर होऊ देऊ नये", असंही त्यांनी सांगितलं.

"भारतात डिजिटल क्रांती ही लोकचळवळ झाली आहे. लोकचळवळ झाल्याशिवाय विकास शक्य नाही",  असं प्रसाद म्हणाले.

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू म्हणाले, "19 भारताची निर्यात वेगाने वाढत आहे. सरकारच्या धोरणांमध्ये सुसूत्रता आली आहे. आमचं धोरण मजबूत आहे आणि दिशा स्पष्ट आहे. कासासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं कणखर नेतृत्व. आमच्याकडे नरेंद्र मोदींच्या रुपाने असं नेतृत्व आहे. त्यामुळे निर्णय घेताना अडचण येत नाही."

याअगोदरच्या उद्घाटनाच्या सत्रात सद्गुरू जग्गी वासुदेव आणि योगगुरू बाबा रामदेव यांच्याशी कवी आणि गीतकार प्रसून जोशी यांनी संवाद साधला.

पाकिस्तान नापाक झालाय, त्याला शुद्ध करायला लागणार आहे. भारत शांतताप्रिय देश आहे. पण कुणी आपले डोळे काढले तर आपल्यालाही दुसऱ्याचे डोळे काढता येतात, हे पंतप्रधान मोदींना सांगायला हवं, असं योगगुरू रामदेव बाबा यांनी सांगितलं. क्रांतीशिवाय क्रांती नाही, असंही ते म्हणाले. न्यूज18 नेटवर्कच्या रायझिंग इंडिया 2019 या शिखर परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रात ते बोलत होते. पाकिस्तानचे पंतप्रधान नपुंसक आहेत, त्यांना धडा शिकवायला हवा, असंही ते म्हणाले.

First published: February 25, 2019, 7:24 PM IST

ताज्या बातम्या