मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनांबाबत मोठी वक्तव्य केलं आहे. या वर्षाअखेरपर्यंत बऱ्याच गाड्या या इलेक्ट्रिक स्वरुपात येणार आहे. यावेळी ते बोलताना म्हणाले की, डिझेल चोरी करणं सोपं आहे पण वीज चोरी करणं नाही. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहान वाढणार आहे. आता इलेक्ट्रिक बस चालणार आहे.
आता सगळ्या गाड्या इलेक्ट्रिक होणार आहे. इलेक्ट्रिक बस आली आहे, मात्र बऱ्याच मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बस चालवण्याचा मानस आहे. दीड ते दोन लाख प्रवासी बसने प्रवास करतात. मात्र उत्तम सोयी सुविधा दिल्या तर हीच संख्या 10 लाखांपर्यंत पोहोचेल असा विश्वास त्यांनी गडकरी यांनी व्यक्त केला.
एक डिझेलची बस चालते तेव्हा प्रति किलोमीटरमागे खर्च येतो 150 रुपये. तेच इलेक्ट्रिक बसचा खर्च काढला तर 39 रुपये प्रति किलोमीटर एवढा येतो. एसी बससाठी 41 रुपये किलोमीटर मागे खर्च येतो. ही तफावत खूप मोठी आहे. त्यामुळे उत्तम सुविधा देऊन डिझेलचे पैसे वाचवता येऊ शकतात.
याचा फायदा एवढा आहे की जवळपास 25 टक्के फायद्यामध्ये ह्या बस चालू शकतील असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. एवढंच नाही आता ट्रॅक्टर आणि ट्रक देखील इलेक्ट्रिकवर येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. कार, बाईक, ट्रॅक्टर, ट्रक, बस अशी अनेक पद्धतीची वाहनं इलेक्ट्रिकमध्ये उपलब्ध होणार आहेत.
नरेंद्र मोदी यांना अडकवण्यासाठी माझ्यावर दबाव, अमित शाह यांचा सर्वात मोठा खुलासा
सध्या स्टेट ट्रान्सफोर्ट एकही फायद्यामध्ये चालत नाही एकाही राज्यातली. राज्यांनाही याचा खूप मोठा फायदा होणार आहे. पेट्रोल डिझेलची चोरी करणं सोपं आहे इलेक्ट्रिकची चोरी होणार नाही असंही गडकरी खोडकर शब्दात म्हणाले आहेत.
आम्ही अजून एक सिस्टिम आणायच्या विचारात आहोत, तुम्ही बसमध्ये चढताना कार्ड दाखवाल आणि उतरताना कार्ड दाखवाल तुम्ही जेवढा प्रवास केला तेवढ्या प्रवासाची रक्कम तुमच्या बँक खात्यातून वजा केली जाणार आहे. पैसे देण्याची गोष्ट येत नाही त्यामुळे चोऱ्यामाऱ्या होण्याचा प्रश्न येत नाही. दीड ते दोन लाख इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्याचा आमचं लक्ष्य आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nitin gadkari