Rising India 2019 : देशाला आकार देणारे वेगवेगळ्या विचारांचे नेते येणार एकाच व्यासपीठावर

Rising India 2019 : देशाला आकार देणारे वेगवेगळ्या विचारांचे नेते येणार एकाच व्यासपीठावर

वेगवेगळ्या विचारसरणीचे, वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे विचारवंत, तज्ज्ञ, नेते, कलाकार यांना एका मंचावर आणून देशाच्या विकासावर चर्चा घडवून आणण्याच्या उद्देशाने न्यूज18 नेटवर्कच्या वतीने Rising India summit 2019 आयोजित करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 22 फेब्रुवारी : प्रत्येक नव्या आघाताबरोबर भारत कमकुवत न होता उलट अधिकाधिक प्रबळ होत आहे आणि पुलवामा हल्ल्यानंतर विरोध विसरून एकत्र येत निषेध करणाऱ्या भारतीयांनी दाखवून दिलं आहे आणि आता त्यालाच सुसंगत वेगवेगळ्या विचारसरणीचे, वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे तज्ज्ञ, नेते, कलाकार यांना एका मंचावर आणून देशाच्या विकासावर चर्चा घडवून आणायचं काम न्यूज18 नेटवर्क करत आहे. पुढच्या आठवड्यात होणारी े ही शिखर परिषद त्यासाठीच आयोजित करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या रायझिंग इंडिया समिट 2019ची सुरुवात करणार आहेत. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी लोकसभा निवडणुकांचा काळ लक्षात घेऊन या परिषदेचा विषय ‘Beyond Politics: Defining National Priorities’ असा ठरवण्यात आला आहे.

राजकारण, कला, उद्योग, अध्यात्म आणि सांस्कृतिक क्षेत्रातले मान्यवर या परिषदेला हजेरी लावणार आहेत.

पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अनुक्रमे कमलनाथ आणि योगी आदित्यनाथ यांच्याबरोबरच आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण, कमल हासन तसंच अध्यात्मिक गुरू सद्गुरू, बाबा रामदेव यांच्यासारखे सुमारे 24 मान्यवर या परिषदेला उपस्थित राहतील.

येत्या २५ आणि २६ फेब्रुवारीला दिल्लीत ही परिषद होणार आहे. अनिल कुंबळे, मेरी कोमसारखे खेळाडू त्यांच्या क्षेत्रातल्या आव्हानांविषयी बोलतील तर तेजस्वी यादव (राजद), अनुराग ठाकूर (भाजप), दिव्या स्पंदना (काँग्रेस), चिराद पासवान (लोजपा)आदी तरुण राजकारणी त्यांच्या मनातील नव्या भारताच्या कल्पना सांगतील. त्यांच्यापेक्षा एक पिढी वर असलेले नव्या फळीतले नेते - ओमर अब्दुल्ला, सचिन पायलट, बाबुल सुप्रियो हे देशाच्या सद्यस्थितीतल्या राजकारणाचा ऊहापोह करतील.

रायझिंग इंडिया 2019 या परिषदेला उद्योग क्षेत्रातील आघाडीची नावंही उपस्थिती लावणार आहेत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री या परिषदेला हजर राहण्याचीही शक्यता आहे.

थोडक्यात भारत घडवण्याची क्षमता असलेली पुढच्या फळीतली सर्व क्षेत्रांतील मंडळी रायजिंग इंडिया परिषदेत आपापले विचार घेऊन येतील. या सर्व विचारधारांनी भारतासाठी एकत्र येऊन काम करावं यासाठी व्यासपीठ निर्माण करण्याचं काम रायझिंग इंडिया या उपक्रमातून करण्यात येत आहे.

First published: February 22, 2019, 3:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading