मराठी बातम्या /बातम्या /देश /Joshimath शहर धसतंय, चारधाम यात्रेवरही संकट, बद्रीनाथाचे दर्शन होणार का?

Joshimath शहर धसतंय, चारधाम यात्रेवरही संकट, बद्रीनाथाचे दर्शन होणार का?

जोशीमठ हे देशातलं सर्वात मोठं भूकंपप्रवण क्षेत्र आहे. ते पाचव्या झोनमध्ये येतं. 1976मध्ये मिश्रा समितीने एक रिपोर्ट सादर केला होता त्यात जोशीमठ शहर जमिनीत खचत चाललं आहे असं म्हटलं होतं.

जोशीमठ हे देशातलं सर्वात मोठं भूकंपप्रवण क्षेत्र आहे. ते पाचव्या झोनमध्ये येतं. 1976मध्ये मिश्रा समितीने एक रिपोर्ट सादर केला होता त्यात जोशीमठ शहर जमिनीत खचत चाललं आहे असं म्हटलं होतं.

जोशीमठ हे देशातलं सर्वात मोठं भूकंपप्रवण क्षेत्र आहे. ते पाचव्या झोनमध्ये येतं. 1976मध्ये मिश्रा समितीने एक रिपोर्ट सादर केला होता त्यात जोशीमठ शहर जमिनीत खचत चाललं आहे असं म्हटलं होतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

डेहराडून, 09 जानेवारी :  उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये ओढावलेलं संकट आता बद्रीनाथ यात्रेसाठीही अडथळा ठरू शकतं. 2023 च्या चारधाम यात्रेबाबत लोकांच्या मनात आता प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक ठिकाणी जमीन खचल्याने, भेगा पडल्याने चारधाम यात्रेच्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. आता जोशीमठ इथं असलेलं लष्कराच्या हेडक्वार्टरमधील काही बराकींमध्ये भेगा पडल्या आहेत. त्यामुळे लष्कराने बराकी रिकाम्या केल्या आहेत. सध्याच्या परिस्थिती भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. स्थानिक प्रशासनाकडून मात्र अद्याप लष्कराला मदतीसाठी बोलावण्यात आलेलं नाही.

उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रेला धार्मिक आणि आर्थिकदृष्ट्या मोठं महत्त्व आहे. चारधाम यात्रेमुळे गढवालमधील आर्थिक उलाढाल होते आणि मोठा महसूल राज्य सरकारला मिळतो. जोशीमठातील संकटामुळे बद्रीनाथ यात्रेवर संकट निर्माण झालं आहे.

हेही वाचा : विमानतळावर प्रवाशाकडील चॉकलेट पावडरची केली तपासणी; आत लपवलेली ती वस्तू पाहून अधिकारीही शॉक

चारधाम यात्रेचं प्रवेशद्वार असलेल्या ऋषीकेशमधील संत समाज आणि पुरोहित यांनी यात्रेच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केलीय. यात्रेसाठी लवकरात लवकर पर्यायी मार्ग तयार करावा अशी विनंती सरकारकडे केली जात आहे. यामुळे २०२३ ची चारधाम यात्र सुरळीतपणे पार पडू शकेल. चारधाम यात्रा वसंत पंचमीच्या दिवशी राजमहलपासून बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडल्यानतंर सुरू होते. त्यामुळे यासाठी सरकारकडे आता खूपच कमी वेळ उरला आहे.

जोशीमठमधील हॉटेल शेजारच्या हॉटेलवर एका बाजूला झुकले आहे. यामुळे शेजारील इमारतींना धोका आहे. सुरक्षेच्या कारणास्तव इमारत रिकामी करण्यात आली आहे. तर इमारतीच्या मागच्या बाजूला राहणाऱ्या लोकांना याचा धोका आहे. जर इमारत कोसळली तर मागच्या बाजूला राहणाऱ्या लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

हेही वाचा : नेमकं चाललंय काय? आता इंडिगोच्या विमानात तिघांकडून एअर होस्टेसचा विनयभंग, कॅप्टनलाही मारहाण

जोशीमठबाबत १९७६ चा रिपोर्ट काय सांगतो?

जोशीमठ हे देशातलं सर्वात मोठं भूकंपप्रवण क्षेत्र आहे. ते पाचव्या झोनमध्ये येतं. १९७६ मध्ये मिश्रा समितीने एक रिपोर्ट सादर केला होता त्यात जोशीमठ शहर जमिनीत खचत चाललं आहे असं म्हटलं होतं. तेव्हा अनेक लोकांनी भूस्खलनाच्या तक्रारी दाखल केल्यानतंर मिश्रा समिती स्थापन करण्यात आली होती. रिपोर्टमध्ये जंगलतोड, मातीची धूप आणि तीव्र हवामान यामुळे अशी परिस्थिती ओढावत असल्याचं म्हटलं होतं.

First published:

Tags: Uttarakhand