RAISE 2020 : AI विषयीच्या जागतिक परिषदेत RIL चे मुकेश अंबानी होणार सहभागी

RAISE 2020 : AI विषयीच्या जागतिक परिषदेत RIL चे मुकेश अंबानी होणार सहभागी

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) या विषयावर एक जागतिक परिषद भारत सरकार आयोजित करत आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : AI अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या विषयावरच्या जागतिक परिषदेत आज रिलायन्सचे (RIL) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) सहभागी होणार आहेत. Responsible AI for Social Empowerment 2020 किंवा RAISE 2020 या नावाची ही शिखर परिषद आजपासून (5 ऑक्टोबर) पाच दिवस चालणार आहे. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय  (Ministry of Electronics and Information Technology (MeitY) आणि नीती आयोग ( NITI Aayog) यांची मिळून या शिखर परिषदेचं आयोजन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेचं उद्घाटन करणार आहेत.

व्हर्च्युअल पद्धतीने होणाऱ्या या परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबहला संध्याकाळी 7 वाजता करणार आहेत. रिलायन्स इंडिस्ट्रीजचे मुकेश अंबानी हेसुद्धा 5 ऑक्टोबरला परिषदेत भाषण करणार आहेत. नीती आयोगाचे प्रमुख अमिताभ कांत, IBM चे अरविंद कृष्णा, राज रेड्डी आदी मान्यवर या परिषदेला उपस्थित राहतील.

5 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान हे व्हर्च्युअल समिट होईल. IT आणि उद्योग क्षेत्रातले नामवंत, भारत सरकारचे प्रतिनिधी, नीती आयोगाचे प्रतिनिधी आणि संशोधक, शास्त्रज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या जागतिक परिषदेचं उद्घाटन करतील. त्यापूर्वी माहिती तंत्रज्ञान, संज्ञापन आणि कायदा मंत्री रविशंकर प्रसाद या परिषदेचा उद्देश स्पष्ट करतील. कृत्रिम बुद्धिमत्तेचा सामाजिक भान ठेवून वापर केला तर त्यातून सबलीकरण कसं करता येईल. 1 अब्ज भारतीयांना या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या वापराने सबल करता येईल, असं सांगितलं जातं.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: October 5, 2020, 6:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या