एका रात्रीत बदललं रिक्षावाल्याचं नशीब! 30 रुपयांच्या लॉटरीवर जिंकले 50 लाख

एका रात्रीत बदललं रिक्षावाल्याचं नशीब! 30 रुपयांच्या लॉटरीवर जिंकले 50 लाख

नागालॅंड सरकारनं सुरू केलेल्या स्टेट लॉटरीमुळं एका रिक्षाचालकाचे नशीब फळफळले.

  • Share this:

नागालॅंड, 01 ऑक्टोबर : एका रात्रीत नशीब बदललं जातं, याची अनेक उदाहरणे आपल्याला माहित आहे. पण एका रात्रीत नशीबानं लखपती होणारी लोकं फार कमी असतात. अश्याच एका नागालॅंडच्या रिक्षाचालकाचे नशीब एका रात्रीत फळफळलं. याचे श्रेय जातं ते नागालॅंड सरकारच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या स्टेट लॉटरीला.

या लॉटरीच्या पहिल्या बक्षिसाची रक्कम होती तब्बल 50 लाख रुपये. आश्चर्याची बाब म्हणजे या लॉटरीचे पहिले बक्षीस एका रिक्षा चालकाला लागले आहे. या रिक्षा चालकाचे नाव आहे गौर दास. गौर दास पूर्व वर्धमान राज्यातील गुस्करा येथे राहणारा आहे. राज्य लॉटरीचे पहिले पारितोषिक जिंकल्यानंतर एका रात्रीत गौर दास सेलिब्रिटी झाला आहे. त्यामुळं त्यांच्या घरी मुलाखती घेणाऱ्यांची आणि त्याला भेटणाऱ्यांची गर्दी झाली आहे.

दास आपल्या विधवा आई, पत्नी आणि तीन मुलांसोबत राहतात. दास यांच्या रिक्षातून मिळणाऱ्या कमाईवर घर चालत नसल्यामुळं त्यांची आई आणि पत्नी दोघंही कामगार म्हणून काम करत होते. त्यांचा मोठा मुलगा तिसरीत तर दोन मुली बालवर्गात आहेत. त्यामुळं या एक लॉटरीमुळं दास यांचे जीवनच बदललं. दरम्यान, या मिळालेल्या पैशातून काय करणार असे विचारल्यास दास यांनी, "गेली कित्येक वर्ष आम्ही एकत्र फिरायला गेलो नाही आहोत. त्यामुळं एकत्र फिरायला जायचे होते, मात्र पावसामुळं ते शक्य झाले नाही", असे सांगितले. दरम्यान, लॉटरीबाबत सांगताना, खरतरं दास लॉटरी खरेदी करण्यास तयार नव्हते. मात्र लॉटरी विक्रेत्यानं तिकीट घेण्यासाठी जबरदस्ती केली म्हणून दास यांनी तिकीट घेतले.

वाचा-खूशखबर! सरकार इनकम टॅक्समध्ये मोठी सवलत देण्याची शक्यता

एका रिक्षावाल्याला मिळालेल्या या बक्षीसामुळं सर्वांनी सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. तसेच सरकारच्या वतीनं सुरू करण्यात आलेली ही लॉटरी यशस्वी ठरत आहे.

वाचा-डोळ्यात पाणी आणणारा VIDEO : रिक्षा ओढणाऱ्या या माणसाचं रडणं ऐकू येतंय?

30 रुपयांच्या लॉटरी तिकीटाचे मिळाले 50 लाख

दास यांनी, लॉटरीचे तिकीट खरेदी करताना खिशात फक्त 70 रुपये होते. त्यातून त्यांनी 30 रुपयांचे तिकीट खरेदी केले. खरेदी केलेल्या तिकीटावर 50 लाख रुपयांचे बक्षीस लागले, यावर दास यांचा विश्वास बसत नव्हता. त्यांनी ही बातमी आपल्या पत्नीला दिली. आज दास यांनी बॅंकमध्ये आपले तिकीट जमा करून बक्षीसाची रक्कम मिळवली.

वाचा-60 वर्षांच्या आजींनी एका मिनीटात खाल्ल्या रेकॉर्डब्रेक इडल्या आणि...

VIDEO: 'पक्षासोबत प्रामाणिक राहणं गुन्हा असेल तर तो मी केलाय'; खडसेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: nagaland
First Published: Oct 1, 2019 06:13 PM IST

ताज्या बातम्या