हे आहेत या लोकसभा निवडणुकीतले सगळ्यात श्रीमंत उमेदवार

हे आहेत या लोकसभा निवडणुकीतले सगळ्यात श्रीमंत उमेदवार

लोकसभा निवडणुकीत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरताना आपली संपत्ती जाहीर करत असतात. उमेदवारांच्या संपत्तीत वाढ झाली की घट झाली याबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते. पण या निवडणुकीत सगळ्यात श्रीमंत उमेदवार कोण याची चर्चा रंगली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 मे : लोकसभा निवडणुकीत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरताना आपली संपत्ती जाहीर करत असतात. उमेदवारांच्या संपत्तीत वाढ झाली की घट झाली याबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते.

पाटलीपुत्रचे उमेदवार

बिहारमधले अपक्ष उमेदवार रमेश कुमार हे लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीतले सगळ्यात श्रीमंत उमेदवार आहेत. रमेशकुमार शर्मा यांनी आपली संपत्ती 1107 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचं जाहीर केलं आहे.

रमेशकुमार हे बिहारच्या पाटलीपुत्र मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याकडे 7 कोटी 8 लाख 33 हजार 190 रुपयांची संपत्ती आहे तर 1100 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

तेलंगणाचे उमेदवारही श्रीमंत

रमेशकुमार शर्मा यांच्या खालोखाल कोंडा विश्वेश्नर रेड्डी यांच्याकडे 895 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते तेलंगणाच्या चेवेल्लामधून निवडणूक लढवत आहेत.

या यादीत तिसरा क्रमांक आहे, मध्य प्रदेश छिंदवाडाचे नकुल नाथ यांचा. त्यांच्याकडे 660 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

उमेदवारांची सरासरी संपत्ती किती ?

सातव्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये उमेदवाराची सरासरी संपत्ती 4 कोटी 61 लाख आहे. काँग्रेस उमेदवारांची सरासरी संपत्ती 17 कोटी 15 लाख रुपये आहे तर भाजप उमेदवारांची संपत्ती 9 कोटी 82 लाख रुपये आहे.

यांच्याकडे आहे शून्य संपत्ती

दुसरीकडे, पंजाबमधल्या संगरूरचे काँग्रेसचे उमेदवार पप्पू कुमार, उत्तर प्रदेशातल्या महाराजगंजमध्ये जय हिंद पार्टीचे शिवचरण आणि उत्तर प्रदेशातल्या सलेमपूरचे काँग्रेसचे उमेदवार सुनील कुमार पांडे यांच्याकडे मात्र शून्य संपत्ती आहे.

लोकसभा उमेदवारीसाठी अर्ज भरताना काही उमेदवारांनी आपण घेतलेल्या कर्जाचाही उल्लेख केला आहे. बेगुसरायमधून निवडणूक लढवणाऱ्या कन्हैयाकुमारने तर आपण बेरोजगार असल्याचं म्हटलं आहे. देशभर दौरे करून आणि भाषणं करून आपण पैसै कमवले, असंही त्यांने म्हटलं आहे.

===========================================================================

VIDEO : अमित शहांच्या रॅलीत तुफान दगडफेक आणि जाळपोळ

First published: May 14, 2019, 8:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading