VIDEO : रिया चक्रवर्तीची 'लायकी' काढणाऱ्या वक्तव्याने बिहारचे डीजीपी वादात, टीकेनंतर मागितली माफी

VIDEO : रिया चक्रवर्तीची 'लायकी' काढणाऱ्या वक्तव्याने बिहारचे डीजीपी वादात, टीकेनंतर मागितली माफी

रिया चक्रवर्तीची लायकी नाही...या वक्तव्यामुळे बिहारचे डीजीपी वादात सापडले आहेत

  • Share this:

पाटना, 19 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पुढील तपास सीबीआयकडे सोपवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बिहारचे डीजीपी एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाले की, बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर टिप्पणी करण्याची रिया चक्रवर्तीची लायकी (औकात) नाही.

डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, बिहार पोलिसांनी जे काही केलं, ते योग्य होतं आणि कायद्याच्या नियमांअंतर्गत होतं.

यावेळी पत्रकारांनी गुप्तेश्वर पांडे यांना रिया चक्रवर्तीच्या वक्तव्याबाबत विचारलं, ज्यामध्ये रियाने बिहार पोलिसांच्या तपासात राजकारण असल्याचं वक्तव्य केलं होतं आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचाही उल्लेख केला होता. रिया चक्रवर्तीने बिहार पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

हे वाचा-सुशांत प्रकरणात सुप्रीम कोर्टात फेरयाचिका दाखल करणार का ठाकरे सरकार?

आता बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी या प्रकरणात क्षमा मागितली आहे. CNNNews18 शी बोलताना ते म्हणाले की, जर त्यांच्या वक्तव्यामुळे काही त्रास झाला असेल तर माफी मागतो..

डीजीपी यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका केली जात आहे. अनेकांनी या टिप्पणीवर नाराजी व्यक्त केली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 19, 2020, 8:47 PM IST

ताज्या बातम्या