अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री टिलरसन यांनी घेतली मोदींची भेट

दहशतवादविरोधातल्या लढ्यामध्ये अमेरिका भारताबरोबर उभा आहे, दहशतवाद्यांची आश्रयस्थळं सहन केली जाणार नाहीत, असं पाकचं नाव न घेता टिलरसन यांनी खडसावलं.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 26, 2017 10:01 AM IST

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री टिलरसन यांनी घेतली मोदींची भेट

26 ऑक्टोबर: अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांनी काल पंतप्रधान मोदींची भेट घेतली.दहशतवादविरोधातल्या लढ्यामध्ये अमेरिका भारताबरोबर उभा आहे, दहशतवाद्यांची आश्रयस्थळं सहन केली जाणार नाहीत, असं पाकचं नाव न घेता टिलरसन यांनी खडसावलं.

डोनाल्ड ट्रम्पही पाकला वारंवार फटकारत असतात. त्याच धोरणाचा पुढचा भाग म्हणून टिलरसन यांच्या या विधानाकडे पाहता येईल, असं तज्ज्ञांचं मत आहे. टिलरसन गेल्या ५ दिवसांपासून आशियाच्या दौऱ्यावर आहेत. सौदी अरेबिया, कतार, अफगाणिस्तान, इराक आणि पाकिस्तानला भेट दिल्यावर ते भारतात आले. सुषमा स्वराज यांची भेट घेतल्यावर त्यांनी काल संध्याकाळी मोदींची भेट घेतली.

दरम्यान अमेरिकेत कामानिमित्त येणाऱ्या परदेशी नागरिकांविषयीचं ट्र्म्प सरकारचं नकारात्मक धोरण सुरुच आहे. आता H1 बी व्हिसाचे मुदतवाढीचे नियम ट्रम्प सरकारनं आणखी जटील केले आहेत. एच1 बी व्हिसाच्या मुदतवाढीसाठी परकीय नागरिकांना पुन्हा एकदा सर्व कागदपत्रांची तपासणी करून घ्याली लागणार आहे. ही कागदपत्र तपासून घेण्याची संपूर्ण जबाबदारी ही त्या परकीय नागरिकांवर असेल असंही ट्रम्प सरकारनं स्पष्ट केलं आहे. यापूर्वी H1बी व्हिसाच्या मुदतवाढीच्या वेळी कागदपत्र पुन्हा तपासण्याची गरज नव्हती. मात्र आता परदेशी नागरिकांना पुन्हा या सगळ्या चौकशीच्या फेऱ्यातून जावं लागणार आहे. या फेऱ्याचा मोठा फटका हा भारतीय आयटी इंजिनिअरना बसणार आहे.

यासंदर्भात सुषमा स्वराज यांनी टिलरसन यांना दिल्लीला आले असताना अमेरिकेतील भारतीयांना त्रास होईल असे नियम एच1बी व्हिसाच्या बाबतीत बनवू नका अशी विनंती केली होती.पण तरीही हा निर्णय घेण्यात आला आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2017 10:01 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...