S M L

CBSE टॉपर विद्यार्थिनीचा आरोप, 12 युवकांनी अपहरणानंतर केला सामुहिक बलात्कार

हरियाणामध्ये महिलांवरील अत्याचार काही कमी होताना दिसत नाही आहे. कारण...

Updated On: Sep 14, 2018 11:31 AM IST

CBSE टॉपर विद्यार्थिनीचा आरोप, 12 युवकांनी अपहरणानंतर केला सामुहिक बलात्कार

हरियाणा, 14 सप्टेंबर : हरियाणामध्ये महिलांवरील अत्याचार काही कमी होताना दिसत नाही आहेत. कारण आता पुन्हा एकदा रेवाडी जिल्ह्यात महिला अत्याचाराची घटना समोर आली आहे. जिथे 19 वर्षाच्या युवतीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडलीये. हाती मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेसोबत तब्बल 12 तरुणांनी अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार केला आहे. ही सगळी मुलं नशेत धुंद होती. त्यामुळे त्यांनी या प्रकारानंतर पळ काढला.

या नराधमांनी पीडितेला आधी नशिले पदार्थ खाऊ खातले आणि पीडिता बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर सामुहिक बलात्कार केला, असा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केलाय. या 12 युवकांविरोधात हरियाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण तक्रार नोंदवतेवेळी पोलिसांनी तक्रार लिहून घेण्यास नकार दिला असा आरोपही कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

पीडित मुलीच्या नातेवाईकांनी सांगितलं की, पीडित मुलगी हरियाणा विभागात 2015मध्ये सीबीएसईमध्ये अव्वल राहिली आहे आणि 26 जानेवारी 2016 रोजी दिल्लीत पीडितेला राष्ट्रपतींनी सन्मानित केलं होतं. पीडित तरुणी दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे आणि आज सकाळी कोचिंगसाठी ती घरातून निघाली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला.

आरोपींना लवकरच अटक केली जाईल

पीडित मुलीवर सध्या जवळच्या स्थानिक रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत तर पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आली आहे. डीजीपींनी सांगितल्याप्रमाणे, सर्व आरोपींची ओळख पटली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल.

Loading...
Loading...

 

VIDEO : सुसाट रेल्वेखाली थरारक स्टंट !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 14, 2018 11:30 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close