यंदा नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पडणाऱ्या पावसाच्या हंगामात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याचं भारतीय हवामान खात्यानं यापूर्वीच म्हटलं आहे. 1 जूनला या पावसाला (monsoon rain) सुरूवात होऊन जून ते सप्टेंबर कालावधीत देशभरात सर्वसाधारण सरासरीच्या 99 टक्के पाऊस झाला आहे. मान्सूनचा (monsoon) परतीचा प्रवास वायव्य भारतातील काही भागांतून सुरू झाला आहे. हे वाचा - ‘त्या’ व्यक्तीचा फोटो झळकला वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण; पोलिसांनी केली अटक यंदाचा नैऋत्य मान्सून हंगाम 1 जूनला सुरू झाला होता. तो 30 सप्टेंबरला संपला आहे. या हंगामात देशाच्या वायव्य भागात 96 टक्के, मध्य भागात 104 टक्के, पूर्व आणि ईशान्य भागांत 88 टक्के आणि दक्षिणेत 111 टक्के असं विभागनिहाय पावसाचं प्रमाण राहिलं आहे. यापैकी जून महिन्यात 110 टक्के पाऊस झाला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत पावसाचं प्रमाण अनुक्रमे 93 आणि 76 टक्के राहिलं. तर, सप्टेंबरमध्ये सर्वाधिक 135 टक्के पाऊस पडला.६ ऑक्टोबर:मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला प राजस्थान,संलग्न गुजरात काही भागातून आजपासून सुरवात.
गुजरातच्या काही भागातून,पूर्ण राजस्थान,पंजाब,हरियाणा, चंदीगड,दिल्ली,जम्मू-काश्मीर,लडाख,हिमाचल प्रदेश,उत्तराखंड, उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश काही भागातून परतीसाठी पुढचे २४ तास अनुकूल. - IMD — K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 6, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.