क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर धोनी या पक्षाकडून लढणार निवडणूक?

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर धोनी या पक्षाकडून लढणार निवडणूक?

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आता सुरूवात झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 जुलै : क्रिकेटपट्टू महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरू असताना तो निवृत्तीनंतर काय करणार? यावर देखील चर्चा सुरू झाल्या आहेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी भाजपची सदस्यता घेणार असल्याचं बोललं जात आहे. भाजप नेत्यानं तसा दावा केल्यानं आता चर्चांना उधाण आलं आहे. बिहार विधानपरिषदेचे सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी धोनीनं भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी चर्चा केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे या चर्चा आणखो जोरात सुरू झाल्या आहेत.

भाजप नेत्यांनी घेतील धोनीची भेट

लोकसभा निवडणुकीपूर्वी जनसंपर्क अभियानाच्या निमित्त भाजप नेत्यांनी महेंद्रसिंह धोनीची भेट घेतली आहे. खेळ, शिक्षण, साहित्य आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांना भाजपमध्ये येण्यास प्राधान्य दिलं जात असल्याची माहिती यावेळी संजय पासवान यांनी दिली आहे. धोनीनं भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्याचा फायदा हा पक्षाला होईल असं देखील संजय पासवान यांनी म्हटलं आहे. नेत्यांपेक्षा जनतेला पक्षाकडे वळवण्याकरता धोनीचा फायदा जास्त होईल असं देखील पासवान यांचं म्हणणं आहे. प्रत्येक क्षेत्रातील आदर्श व्यक्तिनं भाजपमध्ये प्रवेश करावा हाच आमचा प्रयत्न असल्याचं संजय पासवान यांनी म्हटलं आहे.

दलित मुलाशी लग्न करणाऱ्या BJP आमदाराच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल

काय आहे काँग्रेसचं म्हणणं?

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महेंद्रसिंह धोनीची भेट घेतली होती. त्यावेळी महेंद्रसिंह धोनीला भाजपनं केलेल्या कामांची माहिती देण्यात आली होती. दरम्यान, धोनीला राजकारणात यायचं असेल तर त्याला कोणत्यातरी पक्षात प्रवेश करावा लागेल असं काँग्रेसचं म्हणणं आहे. सध्या भाजपच्या सर्वच नेत्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांना पक्षात सामील करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

फॅन्स खुश

महेंद्रसिंह धोनीच्या राजकारणातील प्रवेशामुळे फॅन्स देखील खुश झाले आहे. धोनीनं क्रिकेटचं मैदान गाजवलं तसं आता राजकारणात उतरून कामं करावीत अशी अपेक्षा फॅन्सची आहे.

कर्नाटकचे आमदार फोडताना राज्यातील काँग्रेस गप्प का? अशोक चव्हाणांकडून स्पष्टीकरण

First published: July 11, 2019, 3:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading