आरूषी हत्याकांड प्रकरणी आज निर्णय येण्याची शक्यता

आरूषी हत्याकांड प्रकरणी आज निर्णय येण्याची शक्यता

आज अलाहबाद हाय कोर्ट, डॉ.राजेश तलवार आणि नुपूर तलवार यांच्या याचिकेवर निर्णय येण्याची शक्यता आहे. आरुषी हत्याकांड प्रकरणी, राजेश तलवार आणि नुपूर तलवार यांना २०१३मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

  • Share this:

अलाहबाद,12 ऑक्टोबर: गाजलेल्या आरुषी-हेमराज हत्यांकांड प्रकरणी आज अलाहबाद हाय कोर्ट, डॉ.राजेश तलवार आणि नुपूर तलवार यांच्या याचिकेवर निर्णय येण्याची शक्यता आहे. आरुषी हत्याकांड प्रकरणी, राजेश तलवार आणि नुपूर तलवार यांना २०१३मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

१५ मे २००८ साली आरूषी तलवारची तिच्या राहत्या घरी रात्री हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तिचे वडील राजेश तलवार आणि आई नुपूर तलवार प्रमुख आरोपी आहेत. जन्मठेपेची शिक्षा झाल्यापासून दोघंही तुरुंगात आहेत. जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात तलवार दाम्पत्यांनी अलाहबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

त्यावर आज निर्णय येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची माध्यमांमध्ये खूप चर्चा झाली होती. तसंच पोलिसांनी सुरुवातीच्या तपासात ढिसाळपणा केल्याचा आरोपही झाला होता.या प्रकरणार एक हिंदी चित्रपटही प्रसिद्ध झाला होता.

आता या प्रकरणी राजेश आणि नुपूर तलवार यांच्या बाजूने निर्णय देतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2017 08:53 AM IST

ताज्या बातम्या