लॉकडाउन संपल्यावर 14 एप्रिलनंतरही निर्बंध राहण्याची शक्यता, राज्यांनीही केली मागणी

लॉकडाउन संपल्यावर 14 एप्रिलनंतरही निर्बंध राहण्याची शक्यता, राज्यांनीही केली मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच्या मंत्रिमंडळातील बैठकीत देशाच्या परिस्थितीची माहिती दिली जाईल, अशीही माहिती आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 एप्रिल : विद्यमान परिस्थिती आणि भविष्यातील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या मंत्रिमंडळ मंत्रिगटाची बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच्या मंत्रिमंडळातील बैठकीत देशाच्या परिस्थितीची माहिती दिली जाईल, अशीही माहिती आहे.

काही राज्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून 14 तारखेनंतरही निर्बंध कायम ठेवणे आवश्यक आहे असे म्हटले आहे. कोरोना व्हायरसचे हॉटस्पॉट्स असणाऱ्या भागात लॉकडाउन चालू ठेवणे हा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील प्रस्ताव आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय लॉकडाऊन वाढवण्याबाबत अंतिम निर्णय पंतप्रधान घेतील, असंही कळतंय.

महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनीही केलं आहे भाष्य

'इतर शहराच्या तुलनेत मुंबईत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या जास्त वाढताना दिसत आहे. ही काळजीची गोष्ट असून लोकांनी बाहेर पडू नका, खबरदारी घ्या. एकदम लॉकडाऊन संपणार नाही. जिथं काहीच नाही तिथं प्रथम लॉकडाऊन हटवला जाईल. पण जिथं संख्या जास्त तिथं वेगळा विचार करून निर्णय घेतला जाईल,' अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी काल (रविवारी) दिली होती.

हेही वाचा- लॉकडाऊमध्ये काम ठप्प असल्यामुळे 1 लाख मजुरांच्या मदतीला धावले अमिताभ बच्चन

आरोग्यमंत्र्यांनीच आता थेट लॉकडाऊन वाढवण्याबाबतचे संकेत दिल्याने महाराष्ट्रातील ही लॉकडाऊनचा कालावधी वाढणार हे निश्चित आहे. मात्र काही जिल्ह्यांमधील लॉकडाऊन शिथिल केला जाण्याची शक्यता आहे. कारण जिथं रुग्णांची संख्या कमी आहे, तेथील लॉकडाऊनबद्दल विचार केला जाईल, असंही राजेश टोपे म्हणाले आहेत. त्यामुळे 14 एप्रिलनंतर सरकार नेमका निर्णय घेणार, हे पाहावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 6, 2020 02:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading