नवी दिल्ली, 18 जून : भारत-चीनमध्ये झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले. पहिल्यांदा भारतीय जवानांवर चीनच्या सैनिकांनी हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर देशभरातून राग व्यक्त केला जात आहे. अलवर मधील शूरवीर सुरेंद्र सिंह लडाख येथे चीनविरोधात झालेल्या चकमकीत जखमी झाले आहेत. त्याची पत्नी आणि मुलं अजूनही चिंतेत आहेत. त्यांची पत्नी गुरप्रीत कौर आपल्या चार मुलांसह (3 मुली आणि 1 मुलगा) अलवर येथे राहते. तर वडील बलवंत सिंह आणि आई प्रकाश कौर गावात राहतात.
सुरेंद्र सिंह 20 दिवसांच्या सुट्टीवर आले होते. त्यानंतर 31 जानेवारी रोजी ते ड्यूटीवर रवाना झाले. आर्टिलरी थ्री मीडियममध्ये हवालदाराच्या पदावर ते लेहमध्ये तैनात होते. ते 22 वर्षांपासून सैन्यात सेवा देत आहेत. लेहमध्ये त्यांची बटालियन तैनात आहे. मात्र भारत-चीनमध्ये तणाव सुरू असल्याने त्यांना पुढे हलविण्यात आले होते.
जखमी जवानाची पत्नी गुरप्रीत कौर यांनी सांगितले की, त्यांची सुरेंद्र यांच्यासोबत संभाषण झालं. त्यावेळी सुरेंद्र सिंहांनी त्यांची तब्येत ठीक असल्याचे सांगितले. ते म्हणाले की चीनच्या सैन्यासोबत सामना होत आहे. आम्ही खूप मागे असल्याचं त्यांनी सांगितलं. ते चिनी सैन्याशी बातचीत करण्यासाठी गेले होते. त्यांच्या कमरेला गुरु साहबांची कृपाण म्हणजेच कट्यार त्यांच्याजवळ होती. त्यामुळे ते स्वत:ला चिनी सैनिकांपासून वाचवू शकले आणि अनेक भारतीय सैनिकांना चिनी सैनिकांपासून वाचवले. 2 ते 3 सैनिकांना त्यांनी जखमी केले आहे. कमरेवर पवित्र कृपाण असल्याने त्यांचा जीव वाचला. अन्यथा चिनी सैनिकांनी त्यांना मारलं असतं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
हे वाचा-चीनला पाठिंबा देणाऱ्या काश्मिरींना ओमर अब्दुल्लांनी का दिला Google करण्याचा सल्ल
संपादन - मीनल गांगुर्डे