‘राजीव गांधींबद्दल नरेंद्र मोदींचं ‘ते’ विधान चुकीचं’; भाजप नेत्याचा घरचा अहेर

‘राजीव गांधींबद्दल नरेंद्र मोदींचं ‘ते’ विधान चुकीचं’; भाजप नेत्याचा घरचा अहेर

राजीव गांधींविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विधानावरून आता माजी केंद्रीय मंत्र्यानं भाजपला घरचा अहेर दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 मे : "तुमच्या वडिलांच्या पाठrराख्यांनी त्यांची 'मिस्टर क्लिन' अशी प्रतिमा तयार केली. पण 'भ्रष्टाचारी नंबर 1' अशा ओळखीनेच त्यांचा शेवट झाला," असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्याविरोधात केलं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सर्वच स्तरातून टीका झाली. पण, आता मात्र भाजपला घरचा अहेर मिळाला आहे. कारण भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्यांनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करतो. पण, त्यांनी राजीव गांधींविरोधात 'भ्रष्टाचारी नंबर 1' असं केलेलं विधान चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. राजीव गांधी यांची LTTEनं हत्या केली. भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांचा मृत्यू झाला नाही. मी काय कुणीचं यावर विश्वास ठेवू शकत नाही. मी नरेंद्र मोदींचा आदर करतो. पण, राजीव गांधींविरोधात त्यांनी केलेलं विधान चुकीचं आहे असं माजी केंद्रीय मंत्री श्रीनिवास प्रसाद यांनी ANIशी बोलताना म्हटलं आहे. बोफर्स घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांचा उल्लेख करत काँग्रेसला लक्ष्य केलं होतं.

'भाजपला मिळणार 300 जागा'; ज्योतिष प्राध्यापकाची काँग्रेस सरकारकडून उचलबांगडी

आणखी काय म्हणाले श्रीनिवास प्रसाद

यावेळी बोलताना श्रीनिवास प्रसाद यांनी राजीव गांधी हे राजकारणातील मोठी व्यक्ती होते असं म्हणत त्यांची तुलना अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी केली आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या विधानानंतर काँग्रेसनं देखील मोदींवर टीका केली आहे.श्रीनिवास प्रसाद हे भाजपचे कर्नाटकातील नेते आहेत.

…तर पाकिस्तानचं पाणी रोखणार – नितीन गडकरी

राहुल गांधींचं प्रत्युत्तर

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'मोदीजी, लढाई आता संपली आहे. तुमचं कर्म तुमची वाट पाहतंय. तुमची तुमच्या स्वत:बद्दल असलेली मते माझ्या वडिलांवर लादल्याने तुम्ही वाचू शकणार नाही. माझ्याकडून तुम्हाला खूप सारं प्रेम आणि मिठी, असं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर दिलं होतं.

SPECIAL REPORT: भोपाळचा गड साध्वी प्रज्ञा राखणार? काय आहे प्रचाराचं तंत्र?

First published: May 9, 2019, 10:26 AM IST

ताज्या बातम्या