'मोठा आवाज झाला, आम्हाला वाटलं भूकंप होतोय, आता त्या जागेवर मोठा खड्डा पडलाय'

'मोठा आवाज झाला, आम्हाला वाटलं भूकंप होतोय, आता त्या जागेवर मोठा खड्डा पडलाय'

AIRSTRIKE नंतर पाकिस्तानी नागरिक काय म्हणतात पाहा

  • Share this:

इस्लामाबाद, 26 फेब्रुवारी : पाकिस्तानातल्या बालाकोटमधल्या रहिवाशांना प्रचंड आवाजानं जाग आली. प्रचंड स्फोटाचा आवाज आला. सगळे घाबरून गेले. त्यांना वाटलं नक्कीच भूकंप झाला असणार. बालाकोटमधल्या रहिवाशांची हीच प्रतिक्रिया आहे.

बीबीसी उर्दूशी बोलताना जाबा गावाचे शेतकरी मोहम्मद अदिल म्हणाले, जवळपास 3च्या सुमारास आम्ही सगळे घरातले मोठ्या स्फोटाच्या आवाजानं जागे झालो. आम्हाला वाटलं भूकंप झालाय. नंतर विमानांचे आवाज ऐकू आले.

ते पुढे म्हणाले, सकाळी उठून आम्ही तिथे गेलो तेव्हा तिथे मोठा खड्डा पडला होता. चार-पाच घरंही नष्ट झाली होती.

पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी भारतीय वायु दलाच्या मिराज - 2000 या विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 200 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय वायुदलानं केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांना पळता भुई थोडी झाली. या हल्ल्यामध्ये 5 पाकिस्तानी सैनिक देखील ठार झाले. तर जखमींवर रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. 21 मिनिटं भारतीय हवाई दलानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांच्या तळाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं.प्रत्युत्तरादाखल पाकनं भारतीय हवाई दलावर हल्ला केला. पण, भारतीय हवाई दलापुढे त्यांची डाळ शिजली नाही.

12 दिवसामध्ये मोदींचे पाकला सहा मोठे धक्के

- पुलवामा हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. त्यानंतर केवळ 100 तासांच्या आतमध्ये भारतानं पुलवामा हल्ल्याचा मास्टर माईंड असलेल्या गाजी राशिद आणि कामरान खात्ना केला होता.

- पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला. त्यामुळे पाकिस्तानला व्यापारामध्ये दिलेली सूट बंद झाली.

- मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढल्यानंतर भारतानं पाकिस्तानी वस्तुंवर 200 टक्के कर लावला.

- मोदी सरकारनं रावी नदीवरील पाणी रोखण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शाबपूर

- कांडी याठिकाणी धरणाच्या कामाला सुरूवात देखील झाली आहे. याप्रोजेक्टला नॅशन प्रोजेक्ट म्हणून देखील घोषित करण्यात आलं आहे. मोदी सरकारनं रोखलेलं पाणी आता जम्मू

- काश्मीर आणि पंजाबकडे वळवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली.

- पुलवामा हल्ल्यानंतर भारताला अमेरिका, फ्रान्ससह इस्त्रायलनं देखील पाठिंबा दर्शवला. यानंतर भारतानं संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसुदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याकरता प्रस्ताव मांडला. त्याला चीननं देखील पाठिंबा दर्शवला.

- दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय वायू दलानं पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यामध्ये 300पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले.

भारताबरोबर युद्ध झालंच तर हे देश करू शकतील पाकिस्तानची मदत

First published: February 26, 2019, 8:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading