खाजगी क्षेत्रांत आरक्षण मिळणार का? मोदी सरकारने संसदेत दिलं हे उत्तर

खाजगी क्षेत्रांत आरक्षण मिळणार का? मोदी सरकारने संसदेत दिलं हे उत्तर

औद्योगिक आणि देशांतर्गत व्यापार वृद्धी विभागाने खाजगी नोकऱ्यांमधल्या आरक्षणावर लोकसभेत स्पष्टीकरण दिलं आहे. खाजगी क्षेत्रात आरक्षण देण्याचा सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही, असं या मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : आर्थिक मंदी आणि बेरोजगारीच्या खाईत सापडलेल्या तरुणांसाठी एक चिंतेची बातमी आहे. औद्योगिक आणि देशांतर्गत व्यापार वृद्धी विभागाने खाजगी नोकऱ्यांमधल्या आरक्षणावर लोकसभेत स्पष्टीकरण दिलं आहे. खाजगी क्षेत्रात आरक्षण देण्याचा सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही, असं या मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं. त्यामुळे खाजगी क्षेत्रांतल्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळणार नाही हे स्पष्ट झालं.

मराठा समाजाला आरक्षण

याआधी महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर मराठा समाजाने आरक्षणासाठी मोठं आंदोलन केलं होतं. त्यानंतर सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षण दिलं. सध्या हे प्रकरण कोर्टात असलं तरी आरक्षण मात्र लागू आहे. मागासवर्गीय आणि मराठा समाजासाठी काही कोटा राखून ठेवण्यात आला आहे.

(हेही वाचा : रोज 3 रुपये खर्च करा आणि तुमचं बँक अकाउंट फ्रॉडपासून वाचवा)

सवर्णांसाठी आरक्षण

मोदी सरकारने देशभरातल्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सवर्णांसाठीही 10 टक्के आरक्षण दिलं आणि पुन्हा एकदा खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्यांचा मुद्दा समोर आला. सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण कमी झाल्याने खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्यांमध्येही आरक्षण मिळावं, अशी मागणी अनेक वर्षं होते आहे. पण आता मोदी सरकारने लोकसभेतच याबद्दल स्पष्टीकरण दिल्याने ही मागणी थंड बस्त्यात जाणार, अशी चर्चा आहे.

====================================================================================

First published: December 10, 2019, 3:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading