प्लॅस्टिक कचऱ्याचे वर्गीकरण होणार सोपे; भारतात झालं महत्त्वपूर्ण संशोधन

प्लॅस्टिक कचऱ्याचे वर्गीकरण होणार सोपे; भारतात झालं महत्त्वपूर्ण संशोधन

रिसायकल केलेल्या उत्पादनाची गुणवत्ता खराब होऊ शकते. अशा प्लास्टिकची ओळख पटवण्यातील कोणत्याही चुकांबद्दल संशोधक सतर्क करतात.

  • Share this:

हैद्राबाद, 03फेब्रुवारी : प्लॅस्टिक आणि कचऱ्याचे ढिग (Plastic Waste) ही जगातील अनेक देशांसमोर मोठी समस्या ठरत आहे. ही समस्या कमी करण्यासाठी आणि काही क्षमतांवर पडणारा प्रभाव कमी करण्यासाठी युनिर्व्हसिटी ऑफ हैद्राबादच्या (Univesity Of Hydrabad) संशोधक गटाने प्लॅस्टिक कचरा वर्गीकरणासाठी (Plastic Waste Classification) एक स्वस्तातील पर्याय शोधला आहे. या संशोधनामुळे प्लॅस्टिक कचरा किमान 97 टक्के अचूकपणे ओळखता येणार आहे.

डॉ. राजेंद्र जंजुरी आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. जी. मनोज कुमार यांचा समावेश असलेल्या या संशोधन गटाने लेसरवर आधारित ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोपी (Breakdown Spectroscopy) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लेसर तंत्रज्ञानाचा उपयोग सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकबाबतचा डेटा मिळवण्यासाठी केला जाणार आहे.

रिअल टाईम अ‍ॅप्लिकेशन्सची (Real Time Applications) स्थिती समजून घेण्यासाठी संशोधकांच्या पथकाने तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील वर्गीकरण विभागातून प्लॅस्टिक कचऱ्याचे नमुने घेतले. त्यानंतर त्यांनी विविध प्रकारचे प्लॅस्टिक ओळखण्यासाठी एलआयबी मशीनद्वारे तयार केलेल्या डेटाचा वापर केला.

संशोधक व्दयींनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले, की आमच्या कामामुळे वेगवेगळ्या प्रकारचा प्लॅस्टिकचा कचरा ओळखणे सोपे होईल. यामुळे नुकसानकारक कचऱ्याचे रिसायकलिंग प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे.

हे देखील वाचा -   Work from home चे दुष्परिणाम; सर्वेक्षणात समोर आली धक्कादायक माहिती

प्लॅस्टिक कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर रिसायकलिंग हे प्राथमिक उत्तर आहे. परंतु, रिसायकलिंगसाठी (Recycling) प्लॅस्टिक ओळखणे ही अत्यंत कठीण प्रक्रिया असल्याचे मनोज कुमार यांनी सांगितले. प्लॅस्टिकपासून अनेक गोष्टींची निर्मिती होते. परंतु त्याच्या रिसायकलिंग मानांकनाकडे लक्ष दिले जात नाही. बऱ्याच वस्तु या प्लॅस्टिक मिश्रणाद्वारे देखील बनवल्या जातात. आम्ही तयार केलेल्या यंत्रणेत जेव्हा आपण कचऱ्यावर लेसर मारतो तेव्हा ते कोणत्या प्रकारचे प्लॅस्टिक आहे हे समजते.

प्लॅस्टिकची ओळख पटवताना रिसायकलिंग केलेल्या उत्पादनाची गुणवत्ता खराब होऊ नये, याची काळजी संशोधक घेत आहेत. त्यासंदर्भात यूओएच संशोधकांनी शोधून काढलेल्या पध्दतीमुळे 97 टक्के अचूकता येऊ शकते. त्यामुळे प्लॅस्टिक कचरा ओळखताना चूक होण्याची शक्यता बहुतांशी कमी असते. रिसायकल केलेल्या उत्पादनांच्या निर्मात्यांसह या पध्दतीचा अचूक वापर सर्वांसाठी फायदेशीर ठरेल. तसेच रिसायकल उत्पादनांसाठी कच्च्या मालाची निवड करणेही सोपे जाईल. तसेच यामुळे रिसायकल करणाऱ्यांच्या खर्चातही बचत होईल.

ऑप्टिकल सोसायटी ऑफ अमेरिका (Optical Society of America) या संस्थेच्या ऑप्टिक्स अँड फोनिटिक्स न्यूज या वार्षिक अंकात या दोन्ही शास्त्रज्ञांचा लो कॉस्ट सॉर्टिंग ऑफ प्लॅस्टिक वेस्ट या शीर्षकाखाली पेपर प्रसिध्द झाला आहे.

Published by: Aditya Thube
First published: February 2, 2021, 1:25 PM IST

ताज्या बातम्या