नवी दिल्ली, 07 जुलै : हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गावरील (NH-3, Chandigarh Manali Highway) बाबेलीजवळ एक अल्टो कार बियास नदीत बुधवारी कोसळली. या अपघातात दोन जण वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. आयटीबीपीच्या तुकडी - 2 बटालियनच्या जवानांनी ही कार आता शोधून काढली असून या कारमधील लोकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू (Manali Roda Accsident) आहेत.
बियास नदीचा प्रवाह जोरदार वाहत असतानाही या कारचा शोध घेऊन बचाव कार्य चालू आहे. नदीत एका ढिगाऱ्यावर अडकलेल्या कारपर्यंत पोहोचण्यात लष्कराला यश आले आहे. 6 जुलै रोजी हनुमान मंदिर एनएच-3, चंदीगड मनाली हायवेजवळ 3 प्रवाशांसह कार नदीत पडली होती. याआधी बचावलेल्या बचावलेल्या चालकाला कुल्लू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गावरील बाबेलीजवळ बुधवारी हा अपघात झाला. एक अल्टो कार बियास नदीत कोसळली. त्यात 2 जण वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे, तर चालक जखमी अवस्थेत सापडल्यानंतर त्याला उपचारासाठी कुल्लूच्या प्रादेशिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
हे वाचा -
पांढऱ्या केसांना फक्त डाय करून भागणार नाही; आहारात हे पदार्थ घेताय का पाहा
मिळालेल्या माहितीनुसार, कुल्लू जिल्ह्यातील सुहानी पूल शिरध येथे राहणारा चालक अरुण बहादूर अल्टो कारमधून प्रवाशांसह हमीरपूरहून मनालीकडे जात होता. त्यावेळी कारचे नियंत्रण सुटून कार बाबेलीजवळील बियास नदीत पडली. चालक अरुण कसाबसा बाहेर पडण्यात यशस्वी झाला, मात्र, गाडीसह 2 प्रवासी नदीत वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक बचावकार्य करत आहे.
नदीत वाहून गेलेल्या तरुणाचे नाव अमन असून तो सुंदरनगरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी दुसरा व्यक्ती केवल सिंग (वय 41) गाव द्रांग तहसील पधार जिल्हा मंडी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. तो मनाली येथील एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. या दोघांनाही वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.