मराठी बातम्या /बातम्या /देश /

Tractor rally दरम्यान झालेल्या शेतकऱ्याच्या मृत्यूचं कारण उघड करणारे रिपोर्ट आले समोर

Tractor rally दरम्यान झालेल्या शेतकऱ्याच्या मृत्यूचं कारण उघड करणारे रिपोर्ट आले समोर

26 जानेवारीला (Republic Day Violence) आंदोलक शेतकऱ्यांकडून काढण्यात आलेल्या tractor rally दरम्यान वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. या रॅलीदरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यूही झाला. त्याचा पोस्ट मार्टम रिपोर्ट आणि पोलीस FIR यातून अनेक गोष्टी आता स्पष्ट होत आहेत.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली 27 जानेवारी : गेल्या 2 महिन्याहून अधिक काळापासून शेतकरी केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन (Farmer's protest) करत आहेत. मात्र, 26 जानेवारीला आंदोलक शेतकऱ्यांकडून काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान (tractor rally)वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापटही झाल्याचं पाहायला मिळालं. याच हिंसेच्या (26 January violence) पार्श्वभूमीवर आतापर्यंत राकेश टिकैत, दर्शन पाल यांच्यासह 26 शेतकरी नेते आणि अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या शेतकऱ्याचा मृत्यू कशाने- दरम्यान, मंगळवारी झालेल्या या रॅलीदरम्यान एका शेतकऱ्याचा मृत्यू (farmer died during tractor rally) झाला आहे. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप काहींनी केला होता. मात्र, शवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट झालं असून हा मृत्यू त्यांचा ट्रॅक्टर पलटी झाल्यानंतर झालेल्या जखमांमुळे झाल्याचं समोर आलं आहे. दुसरीकडे, या ट्रॅक्टर रॅलीनंतर तब्बल 550 ट्विटर अकाऊंट ( twitter account) बंद करण्यात आली आहेत. एफआयआरमध्ये नेमकं काय म्हटलंय - पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये (FIR) असं म्हटलं आहे, की पोलीस आंदोलक शेतकऱ्यांना बाहेर काढण्याच प्रयत्न करत होते, मात्र आंदोलकांनी ट्रॅक्टर घेऊन येत पोलिसांनाच मारण्याचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांनी एफआयआरमध्ये संपूर्ण घटनेचं वर्णन केलं आहे. यात ते म्हणाले, की शेतकऱ्यांनी जेव्हा दिल्लीत प्रवेश करण्यास सुरुवात केली तेव्हा आम्ही त्यांनी शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास सांगितले. याशिवाय ट्रॅक्टर अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचंही यात नमूद करण्यात आलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या रॅलीदरम्यानचे काही व्हिडिओदेखील नुकतेच शेअर केले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये काही आंदोलक शेतकरी पोलिसांच्या गाडीवर काठीने वार करत गाडीचे नुकसान करताना दिसत आहेत. याशिवाय आंदोलनादरम्यानचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून यात आंदोलक आपल्या ट्रॅक्टरने दिल्ली पोलिसांच्या गाडीला धडक देत गाडीचे नुकसान करतानाही दिसत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Farmer protest

  पुढील बातम्या