ना गांधीजी 'राष्ट्रपिता' ना भगत सिंग 'शहीद'; जाणून घ्या काय आहे प्रकरण

ना गांधीजी 'राष्ट्रपिता' ना भगत सिंग 'शहीद'; जाणून घ्या काय आहे प्रकरण

जनता भलेही महात्मा गांधींनी राष्ट्रपिता आणि भगत सिंग यांनी शहीद मानत असली तरी सरकारने अधिकृतपणे हे मान्य केले नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 जानेवारी: आज देशभरात 70वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 72 वर्ष झाली. त्यासाठी योगदान दिलेल्या दोन महान व्यक्तींना अद्यापही सरकारी पातळीवर योग्य असा मान दिला जात नसल्याचे समोर आले आहे. जनता भलेही महात्मा गांधींनी राष्ट्रपिता आणि भगत सिंग यांनी शहीद मानत असली तरी सरकारने अधिकृतपणे हे मान्य केले नाही. ही माहिती खुद्द सरकारनेच माहितीच्या अधिकारात विचारल्यानंतर दिली आहे.

हरियाणाच्या मेवात येथील राजुद्दीन जंग यांनी पंतप्रधान कार्यालयाला 2012मध्ये माहितीच्या अधिकारात महात्मा गांधी यांच्या संदर्भात काही प्रश्न विचारले होते. मोहनदास करमचंद गांधी यांना देश-विदेशात कोणत्या नावाने ओळखले जाते. तसेच राष्ट्रपिता, महात्मा, बापू ही नावे त्यांना कशी मिळाली, असे प्रश्न जंग यांनी विचारले होते. पंतप्रधान कार्यालयाने जंग यांचा अर्ज संस्कृतिक मंत्रालयाकडे पाठवला. त्यावर आलेल्या उत्तर असे सांगण्यात आले होते की, महात्मा गांधींनी राष्टपती ही उपाधी देण्यात आली नाही. तसेच त्यासंदर्भात कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. सरकारच्या रेकॉर्डवर मोहनदास करमचंद गांधी असेच नाव असल्याचे उत्तर सांस्कृतीत मंत्रालयाने दिल्याचे जंग यांनी सांगितले.

कोणी दिली राष्ट्रपिता ही उपाधी

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सर्वात पहिला 1944मध्ये एका रेडिओवरून दिलेल्या भाषणात गांधींना राष्ट्रपिता म्हटले होते. अर्थात हे भाषण कधी केले होते त्याच्या तारखेवरून वाद आहे. 4 जून 1944रोजी बोस यांनी सिंगापूर रेडिओवरून दिलेल्या संदेशात गांधींना देशाचे पिता असे म्हटले होते. त्यानंतर 6 जुलै 1944 रोजी सिंगापूर रोडिओवरूनच बोलताा त्यांनी गांधींना राष्ट्रपिता म्हटले होते. 30 जानेवारी 1948 रोजी गांधीजींच्या हत्येनंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी रोडिओवरून दिलेल्या संदेशात आपल्या राष्ट्रपित्याचे निधन झाले असे म्हटले होते.

कोणी म्हटले होते महात्मा

गांधीजींना सर्वात पहिला महात्मा कोणी म्हटले यावरून देखील वाद आहेत. सर्वसाधारण असे सांगितले जाते की 12 एप्रिल 1919 रोजी रविंद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना एक पत्र लिहले होते. ज्यात त्यांनी महात्मा असा उल्लेख केला होता. तर काहींच्या मते 1915 मध्ये राजवैद्य जीवनराम कालिदास यांनी त्यांना सर्व प्रथम महात्मा असे म्हटले होते.

सरकारी नोंदीत भगत सिंग शहीद नाहीत

जनता जरी भगत सिंग यांनी शहीद मानत असली तरी सरकारी पातळीवर अधिकृतपणे अद्यापही त्यांनी शहीद म्हटले जात नाही. एप्रिल 2013मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने आरटीआयद्वारे विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना यासंदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले होते. यासंदर्भात 2016मध्ये PMOकडे विचारणा करण्यात आली होती. तेव्हा देखील अशी माहिती उपलब्ध नसल्याचे म्हटले होते. 19 ऑगस्ट 2013 रोजी हा मुद्दा राज्यसभेत उपस्थित करण्यात आला होता. तेव्हा सरकारने सभागृहात स्पष्ट केले होते की, आम्ही भगत सिंग यांनी शहीद मानतो आणि यासंदर्भात नोंदीमध्ये सुधारणा केली जाईल. पण अद्याप काहीही झाले नाही.

VIDEO : कडाक्याची थंडी...जवानांचं धैर्य, लडाखमध्ये 18 हजार फुट उंचीवर फडकला तिरंगा!

First published: January 26, 2019, 11:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading