Home /News /national /

महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर स्वार होण्यासाठी सज्ज, पहिली झलक!

महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर स्वार होण्यासाठी सज्ज, पहिली झलक!

यंदाच्या चित्ररथावर दर्शनी बाजूस भव्य ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची 8 फूट उंची आणि 6 फूट रूंद पंखाची देखणी प्रतिकृती आहे.

नवी दिल्ली,  22 जानेवारी : प्रजासत्ताक दिन (republic day 2022) काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.  राजधानी दिल्ली (delhi) प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्रातील जैवविविधता मानके (republic day maharashtra chitrarath 2022) हा चित्ररथ सज्ज झाला असून राजपथावरील संचलनात लक्ष वेधक ठरणार आहे. राजधानी दिल्लीतील कँटोन्मेंट परिसरातील रंगशाळेत या चित्ररथाच्या अंतिम टप्प्याचे काम पूर्णत्वास आले आहे. येथील कँटोन्मेंट परिसरातील रंगशाळेत आज केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वतीने प्रजासत्ताक दिनी राजपथावर सादर होणाऱ्या चित्ररथाविषयी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी महाराष्ट्रासह 12 राज्यांची आणि 7 मंत्रालयांची चित्ररथ सादर केली जाणार आहेत. महाराष्ट्रातर्फे ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ आहे. असा आहे महाराष्ट्राचा चित्ररथ यंदाच्या चित्ररथावर दर्शनी बाजूस भव्य ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची 8 फूट उंची आणि 6 फूट रूंद पंखाची देखणी प्रतिकृती आहे. तसंच दीड फूट उंच दर्शविणारे राज्यफुल ‘ताम्हण’ याचे अनेक रंगीत गुच्छ दर्शविले आहेत. त्यावर इतर छोटी आकर्षंक फुलपाखरांची लोभस प्रतिकृती आहे.  चित्ररथावर 15 फूट भव्य असा ‘शेकरू’ राज्यप्राणी तसंच युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेल्या ‘कास पठारा’ची प्रतिमा दर्शविण्यात आलेली आहे. चित्ररथाच्या दर्शनी भागात कास पठारावर आढळणारा सरडा ‘सुपारबा’ 3 फूट उंच दर्शविला आहे, त्यामागे राज्यपक्षी हरियाल,पिवळा कबुतराची प्रतिकृतीही दिसते. चित्ररथाच्या मागील भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेला राज्यप्राणी शेकरूची प्रतिकृती आणि शेवटी राज्यवृक्ष ‘आंबा’ वृक्षाची प्रतिकृती सुमारे १४ ते १५ फूट उंचीचा आहे. दुर्मिळ ‘माळढोक’ पक्षी, महाराष्ट्रात नव्याने सापडलेली ‘खेकड्या’ची तसंच, मासा प्रजाती वाघ, आंबोली  झरा, फ्लेमिंगो, मासा,  गिधाड,  घुबड पक्ष्यांच्या ४ ते ५ फूट उंचीच्या प्रतिकृती दिसत आहे. यासह सुंदर कलात्मक दृष्टिकोनातून जैवविविधता दिसेल असे देखावेही दर्शनीभागावर आहेत. यासोबतच राजपथावरून सरकणाऱ्या चित्ररथासोबत डावी व उजवीकडे दोन-दोन असे चार कलाकार नृत्य सादर करतील. यामध्ये  महाराष्ट्राने गोंधळ ही लोककला सादर केली होती. या स्पर्धेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आला असून यावेळी महाराष्ट्राच्या लोककलेचे सादरीकरण करण्यात झाले आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या