• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Republic Day India Live: राजपथावर दिसले भारताचे बलाढ्य लष्करी सामर्थ्य, मौल्यवान सांस्कृतिक वारसा

Republic Day India Live: राजपथावर दिसले भारताचे बलाढ्य लष्करी सामर्थ्य, मौल्यवान सांस्कृतिक वारसा

राजपथवर देशाची मौल्यवान सांस्कृतिक वारसा आणि आर्थिक प्रगती दर्शविणार्‍या 22 चित्ररथांपैकी 16 चित्ररथ हे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे असतील. 6 विविध मंत्रालये आणि विभागांचे चित्ररथ यात सहभागी होतील.

 • News18 Lokmat
 • | January 26, 2020, 11:29 IST
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  11:38 (IST)

  राजपथावरील सोहळा संपन्न

  10:3 (IST)

  राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहाला सुरुवात

  9:38 (IST)

  पंतप्रधान नरेंद्र मोदी राजपथावर दाखल, राष्ट्रीय युद्धा स्मारकाला वाहिली श्रद्धांजली

  9:31 (IST)

  राज्यपालांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

   - शेती सक्षम झाला तर सर्व काही, बळीराजा चिंतामुक्त यासाठी महात्मा जोतिबा फुले कृषी कर्जमाफी

   - शिवभोजन योजना आजपासून सुरू, गरीब गरजू जेवण मिळेल - टप्याटप्याने राज्यात सर्वत्र योजना लागू होईल

   - मुंबई ट्रान्सहार्बर, मुंबई कोस्टल रोड महत्वकांक्षी प्रकल्प आहे विकास दिशेन वाटचाल

  भारताच्या 71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रविवारी राजपथ येथे देशातील बलाढ्य लष्करी सामर्थ्य, मौल्यवान सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक-आर्थिक प्रगतीचे भव्य प्रदर्शन होणार आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायेर बोलसोनारो हे भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 90 मिनिटांच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. सुरक्षेसाठी हजारो पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवान दक्षता ठेवतील. राजपथवर देशाची मौल्यवान सांस्कृतिक वारसा आणि आर्थिक प्रगती दर्शविणार्‍या 22 चित्ररथांपैकी 16 चित्ररथ हे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे असतील. 6 विविध मंत्रालये आणि विभागांचे चित्ररथ यात सहभागी होतील.