कर्नाटक सरकारला धक्का, लाल पिवळा ध्वज हटवण्याचे केंद्राचे आदेश

असतानाच बेळगाव प्रादेशिक आयुक्त कार्यालयावरील लाल पिवळा ध्वज हटवा अशी सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने केली आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2017 07:04 PM IST

कर्नाटक सरकारला धक्का, लाल पिवळा ध्वज हटवण्याचे केंद्राचे आदेश

संदीप राजगोळकर, बेळगाव

31 जुलै : कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटक राज्याला लाल पिवळ्या रंगाच्या ध्वजास अधिकृत मान्यता देण्याची मागणी केली असतानाच बेळगाव प्रादेशिक आयुक्त कार्यालयावरील लाल पिवळा ध्वज हटवा अशी सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने केली आहे.

बेळगावातील युवक कार्यकर्ते सूरज कणबरकर यांनी प्रादेशिक आयुक्त कार्यालयावर राष्ट्र ध्वजासमोर अनधिकृत रित्या फडकत असलेला लाल पिवळा ध्वज हटवा अशी मागणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून केली होती. त्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाचे अप्पर सचिव दीपक कुमार यांनी कर्नाटक राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून केली होती. प्रादेशिक आयुक्त कार्यालयावरील ध्वज प्रकरणी कायध्या नुसार कारवाई करावी अशी सूचना एक पत्राद्वारे केली आहे.

गेली अनेक वर्षे बेळगावातील जिल्हाधिकारी कार्यालयावर लाल पिवळा ध्वज फडकत आहे या प्रकरणी अनेकदा केंद्र आणि राज्य सरकारचे आदेश येऊन देखील या लाल पिवळ्या ध्वजास जिल्हा प्रशासनाकडून संरक्षण मिळत आहे.आता थेट केंद्रीय गृह मंत्रालयाने यात लक्ष घातल्याने लाल पिवळा ध्वज हटवला जातो की नाही हे बघणं महत्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2017 07:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...