ट्विटरवरील EXIT POLL बाबतचे ट्वीट हटवा; निवडणूक आयोगाचे आदेश

ट्विटरवरील EXIT POLL बाबतचे ट्वीट हटवा; निवडणूक आयोगाचे आदेश

ट्विटरवरील EXIT POLL ट्विट हटवा असे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 मे : अवघ्या काही दिवसांवर लोकसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. त्यापूर्वी आता निवडणूक आयोगानं ट्विटरला EXIT POLL ट्विट हटवा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत EXIT POLLशी संबंधित सर्व ट्विट हटवण्यात येणार आहेत. देशात सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांपैकी शेवटच्या आणि सातव्या टप्प्यातील मतदान हे 19 मे रोजी होणार आहे. तर, निकाल 23 मे रोजी लागणार आहेत. त्यापूर्वी निवडणूक आयोगानं EXIT POLL हटवण्याचा आदेश दिला आहे. आत्तापर्यंत अनेक प्रसार माध्यमांनी निवडणूक पूर्व निकाल काय असतील याचा अंदाज वर्तवला आहे. पण, आता याबाबतचे सर्व ट्विट हे ट्विटरला हटवण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत. 2019ची निवडणूक ही अनेक कारणांनी चर्चेत राहिली आहे. निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमध्ये घेतलेला निर्णय देखील इतिहासात पहिल्यांदा घेण्यात आला.

पश्चिम बंगालमध्ये एक दिवसापूर्वीच प्रचारबंदी

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत निवडणूक आयोगानं नाराजी व्यक्त करत मोठी कारवाई केली आहे. मंगळवारी (14 मे) कोलकातामध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शोदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं कठोरातील कठोर पाऊल उचललं आहे. निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी (16 मे) रात्रीपासूनच प्रचारबंदी लागू केली आहे. या कारवाईनुसार रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही पक्षाला येथे प्रचार करता येणार नाही. लोकसभा निवडणूक 2019च्या अंतिम टप्प्यातील मतदान प्रक्रिया 19 मे रोजी पार पडणार आहे. पण पश्चिम बंगालमधील हिंसाचार पाहता आयोगानं 17 मे ऐवजी 16 मे रोजीच प्रचारबंदी लागू केली आहे.

कलम 324 अंतर्गत निवडणूक आयोगानं ही कारवाई केली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोगानं केलेली ही मोठी कारवाई असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. याव्यतिरिक्त निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालच्या मुख्य आणि गृह सचिवांचीही पदावरून गच्छंती केली आहे.

SPECIAL REPORT: नवी मुंबई पालिका रुग्णालयात डॉक्टर आणि सुविधांचा दुष्काळ

First published: May 16, 2019, 9:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading