मोठी बातमी! कोरोना संकटात Remdesivir बनवणाऱ्या कंपन्यांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

मोठी बातमी! कोरोना संकटात Remdesivir बनवणाऱ्या कंपन्यांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

कोरोनाच्या संकटात आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर हे औषध बनवणाऱ्या कंपन्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 एप्रिल: भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट (Coronavirus 2nd wave) खूपच भयावह रूप घेऊन आली आहे. दररोज कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. वाढत्या रुग्ण संख्येसोबतच रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर (Remdesivir) औषधाचीही मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी देशभरातील विविध ठिकाणी रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे. यामुळेच आता रेमडेसिवीर निर्माता कंपन्यांनी (Remdesivir manufacturers) आपल्या उत्पादनात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि रेमडेसिवीरची अचानक वाढलेली मागणी लक्षात घेता भारतातील रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांनी आपली क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती दरमहा 38 लाख वायल वरुन 78 लाख वायलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन निर्मितीची क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या उपक्रमांची माहितीही अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सांगितली आहे. यामध्ये निर्यात थांबवणे, नवीन क्षमतांसाठी वेगाने मंजुरी, औषधासाठी वापरण्यात येणाऱ्या फॉर्म्युलेशनची निर्यात थांबवणे अशा उपक्रमांचा समावेश असल्याचंही त्यांनी सांगितलं.

वाचा: एकीकडे ऑक्सिजनअभावी जातोय जीव; 'या' व्यक्तीने वाचवले 900 हून अधिक रुग्णांचे प्राण

रेमडेसिवीर उत्पादक कंपन्यांकडून सांगण्यात आले की, दर महिन्याला 78 लाख वायल्स निर्मितीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात ही संख्या 1 कोटी वायल्सपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस असल्याचंही त्यांनी सांगितले आहे.

रेमडेसिवीरवरील सीमा शुल्क माफ

औषध निर्माण विभागाच्या शिफारसीनुसार, तातडीची गरज लक्षात घेता महसूल विभागाने रेमडेसिवीर इंजेक्शन आणि त्याच्या एपीआय / केएसएमवरील सीमा शुल्क माफ केले आहे अशी माहिती केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी दिली आहे.

Published by: Sunil Desale
First published: April 21, 2021, 11:26 PM IST

ताज्या बातम्या