'भारतीय महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर', लंडनमधल्या परिषदेत नीता अंबानींचं वक्तव्य

'भारतीय महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर', लंडनमधल्या परिषदेत नीता अंबानींचं वक्तव्य

लंडनमधल्या क्रीडा व्यवसाय शिखर परिषदेत रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी भाषण केलं. भारताल्या महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत, असं त्या म्हणाल्या.

  • Share this:

लंडन, 8 ऑक्टोबर : लंडनमधल्या क्रीडा व्यवसाय शिखर परिषदेत रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी भाषण केलं. भारताल्या महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत, असं त्या म्हणाल्या. क्रीडा, विज्ञान, राजकारण, समाजकारण, कॉर्पोरेट क्षेत्र, हॉलिवूड, बॉलिवूड या सर्वच क्षेत्रात महिलांनी पुरुषांची मक्तेदारी मोडून काढत प्रगती केली आहे हे त्यांनी ठासून सांगितलं.

इन्स्पायरिंग अ बिलियन ड्रीम्स : द इंडिया अपॉर्च्युनिटी या विषयावर बोलताना त्यांनी भारताने क्रीडाक्षेत्रात केलेल्या प्रगतीचा उल्लेख केला. मुंबई इंडियन्स या टीमच्या माध्यमातून क्रिकेटसाठी केलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी आढावा घेतला. त्यांच्या भाषणाला या परिषदेत चांगला प्रतिसाद मिळाला.

(हेही वाचा : फ्रान्सने भारताकडे सोपवली राफेल विमानं, राजनाथ सिंह यांनी विमानाची केली पूजा)

=================================================================================================

पहिल्या राफेल विमानातून गृहमंत्र्यांची भरारी, पाहा हा VIDEO

First published: October 8, 2019, 7:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading