मुकेश अंबानी झाले आणखी श्रीमंत, संपत्तीत दोन दिवसांत झाली 29 हजार कोटींची वाढ

देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्‍ती असलेले रिलायन्स इंडस्ट्रिजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत गेल्या दोन दिवसांत प्रचंड वाढ झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 16, 2019 08:58 AM IST

मुकेश अंबानी झाले आणखी श्रीमंत, संपत्तीत दोन दिवसांत झाली 29 हजार कोटींची वाढ

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्‍ती असलेले रिलायन्स इंडस्ट्रिजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत गेल्या दोन दिवसांत प्रचंड वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यादरम्यान शेअर बाजारात मोठी घसरण सुरू असताना त्यांना हा फायदा झाला आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत केवळ दोन दिवसांत 29 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीच्या सोमवारी (12 ऑगस्ट) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीनंतर या वेगवान घटना घडल्या आहेत. कंपनीच्या 42व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. यामध्ये सौदीतील तेल कंपनी अरामकोला 20 टक्के शेअर विक्री करण्याचा सर्वात महत्त्वपूर्ण निर्णयदेखील होता.

(वाचा : देशाला मिळणार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ : 'या' व्यक्तीचं नाव आहे सर्वात पुढे)

शिवाय, कंपनीनं 18 महिने स्वतःला पूर्णतः कर्जमुक्त करण्याचा आणि पुढील महिन्यात जिओ फायबर लाँच करण्याचंही जाहीर केलं. रिलायन्स इंडस्ट्रीजकडून करण्यात आलेल्या घोषणांकडे दलाल स्ट्रीटनं सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं.

(वाचा : Best brother in the World : प्रियांका गांधींची POST 'त्या' गोड फोटोसह व्हायरल)

या निर्णयांमुळे वाढलेल्या उत्साहामुळे गेल्या दोन दिवसांतच कंपनीच्या शेअरर्समध्ये 11 टक्क्यांचा वाढीव फायदा झाला आहे. यानुसार आतापर्यंत मुकेश अंबानी यांना संपत्तीत 28 हजार 684 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

Loading...

(वाचा :मोठा निर्णय! पंतप्रधान मोदींकडून 'चीफ ऑफ डिफेंस स्टाफ' पदाची घोषणा)

ब्लूमबर्गच्या अनुक्रमणिकेनुसार, जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी सध्या तेराव्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 49.9 अरब डॉलर एवढी आहे.

भिवंडीत काळजाचा ठोका चुकवणारी रेड्यांची झुंज, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 16, 2019 08:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...