नवी दिल्ली, 6 मे : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (RIL) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी (CMD Mukesh Ambani) यांनी केंद्र सरकारकडे इस्त्रायली संघाला भारतात बोलवण्यासाठी विशेष परवानगी मागितली आहे. ही इस्त्रायली टीम भारतात येऊन रॅपिड कोविड-19 आयडेंटिफिकेशन सोल्यूशनची (Rapid Covid-19 Identification Solution) स्थापना करेल. यामुळे देशात कोरोना चाचणी अधिक सोपी आणि वेगवान होईल. कंपनी यासाठी लोकांना प्रशिक्षणही देईल. रिलायन्स इंडस्ट्रीजने इस्त्रायली स्टार्टअप कंपनी ब्रेथ ऑफ हेल्थकडून 1.5 कोटी डॉलर्समध्ये हे सोल्यूशन खरेदी केलं आहे.
काही सेकंदात मिळतील कोरोना टेस्टिंगचा रिपोर्ट -
रिलायन्सच्या अर्जावर ब्रेथ ऑफ हेल्थच्या प्रतिनिधी मंडळाला तातडीची मान्यता मिळाली आहे. भारतात कोरोनाच्या वाढच्या प्रकोपामुळे रिलायन्स हे रॅपिड टेस्टिंग सिस्टम स्थापित करू इच्छित आहे.
कोरोना व्हायरस कॅरियर आणि रुग्णांची ओळख करणारी ही सिस्टम देशात कोरोना संक्रमणाची गती कमी करण्यास मदतशीर ठरेल. याद्वारे कोरोना टेस्टचा रिपोर्ट काही सेकंदामध्ये येईल, असंही सांगण्यात आलं आहे.
रिलायन्सने जानेवारी 2021 मध्ये ब्रेथ ऑफ हेल्थसह 1.5 कोटी डॉलर्सचा करार केला होता. त्याअंतर्गत रिलायन्सला स्विफ्ट कोविड-19 ब्रेथ टेस्टिंग सिस्टम (Breath Testing System) मिळणार आहे. या रॅपिड टेस्टिंग मशिनद्वारे दर महिन्याला 10 लाख डॉलर खर्च करुन कोट्यवधी लोकांची टेस्ट केली जाऊ शकते. भारतात कोरोना संक्रमणाची वाढती संख्या रोखण्यासाठी या रॅपिड टेस्टिंग सिस्टमची मदत मिळू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Reliance, Reliance Industries, Reliance Industries Limited