मराठी बातम्या /बातम्या /देश /

Reliance Retail लाँच करणार 7-Eleven stores, पहिल्यांदाच भारतात येणार जागतिक स्तरावरील सुविधा

Reliance Retail लाँच करणार 7-Eleven stores, पहिल्यांदाच भारतात येणार जागतिक स्तरावरील सुविधा

जागतिक स्तरावरील पहिलं 7-Eleven रिटेल स्टोअर 9 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या अंधेरी ईस्टमध्ये सुरू होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

  नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर : रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने (Reliance Retail Ventures (RRVL) 7 ऑक्टोबर रोजी मोठी घोषणा केली. US बेस्ड 7-Eleven स्टोअर्स भारतात लाँच करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. पहिलं 7-Eleven रिटेल स्टोअर 9 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या अंधेरी ईस्टमध्ये सुरू होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. त्यानंतर मुंबईतील प्रमुख परिसर आणि व्यावसायिक परिसरात रॅपिड रोलआउट होणार आहे. Reliance Retail Ventures (RRVL) त्यांच्या पूर्ण मालकीच्या 7-India Convenience Retail Limited द्वारे 7-Eleven, Inc (SEI) सह भारतात 7-Eleven सुविधा सुरू करण्यासाठी मास्टर फ्रेंचाइजी करार केला असल्याची माहिती कंपनीने आपल्या निवेदनात दिली आहे. RRVL च्या संचालिका ईशा अंबानी यांनी सांगितलं, की रिलायन्समध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सुविधा दिल्याचा आम्हाला अभिमान आहे. जागतिक स्तरावरील विश्वासार्ह सुविधा स्टोअर 7-Eleven भारतात आणण्याचा आम्हाला अभिमान आहे. 7-Eleven हा किरकोळ रिटेलमध्ये मोठा ब्रँड आहे. यामुळे भारतीय ग्राहकांना त्यांच्या स्वत:च्या परिसरात अधिक सोयी मिळतील. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे आणि वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. जगातील सर्वात मोठ्या किरकोळ विक्रेत्यासाठी भारतात एन्ट्री करण्याची ही योग्य वेळ असल्याचं 7-Eleven, Inc (SEI) चे अध्यक्ष-मुख्य कार्यकारी अधिकारी जो डीपिंटो यांनी सांगितलं.

  14 वर्षांपासून मुकेश अंबानी नंबर वन; सर्वात श्रीमंत 100 व्यक्तींच्या यादीत 6 नव्या लोकांची एन्ट्री, कोण आहेत व्यावसायिक

  दरम्यान, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर मुकेश अंबानी आहेत. 2008 पासून त्यांनी आपला हा पहिला नंबर कायम ठेवला आहे. मागील 14 वर्षांपासून ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्याची संपत्ती 92.7 अब्ज डॉलर्स इतकी आहे.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या