गरिबांना परवडणाऱ्या 4G जिओफोनची घोषणा, फोन मिळणार फ्री

गरिबांना परवडणाऱ्या 4G जिओफोनची घोषणा, फोन मिळणार फ्री

जिओवर 153 रुपये महिना भरून अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. हा फोन टीव्हीशी कनेक्ट करता येईल.

  • Share this:

21 जुलै : गरिबांना परवडणाऱ्या 4G जिओफोनची घोषणा मुकेश अंबानींनी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. जगात सर्वात स्वस्त आणि व्हॉईस कमांड स्वीकारणारा हा स्मार्टफोन असेल. सगळ्यांना परवडणारा फोन आहे. भारतातल्या 22 भाषांशी कनेक्ट आहे. जिओवर 153 रुपये महिना भरून अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. 1500 रुपये डिपाॅझिट ठेवायला लागणार.  हा फोन टीव्हीशी कनेक्ट करता येईल.

फोनमधले फीचर्स

अल्फान्यूमेरिक कीपैड, 4-वे नेविगेशन, कॉम्पैक्ट डिजाइन, 2.4 इंच QVGA डिस्प्ले, SD कार्ड स्लॉट, माइक्रोफोन और स्पीकर, हेडफोन जैक, कॉल हिस्ट्री, फोन कॉन्टेक्ट, रिंगटोन, टॉर्चलाइट, एफएम रेडियो

जिओने गेल्या दहा महिन्यात अनेक वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत. दर सेकंदाला 7 ग्राहक जिओशी जोडले गेले असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. फेसबूक, व्हाट्सअॅपपेक्षाही जास्त गतीने लोक जिओशी जोडले गेले असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. जिओमुळे महिन्याला 120 कोटी जीबी डाटा वापरण्यात आला असून, मोबाईल डाटा वापरात भारताने चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकलं असल्याचं मुकेश अंबानी यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 21, 2017 11:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading