क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी! 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस

क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी! 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस

क्रिकेटच्या दुनियेतही 'जीओ' उतरलं असून स्टार इंडियाच्या माध्यमातून 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर भारत खेळणार असलेल्या क्रिकेटच्या सर्व मॅचेस आता बघता येणार आहे.

  • Share this:

मुंबई, ता. 21 सप्टेंबर : कर लो दुनिया मुठ्ठी मे म्हणत 4G च्या माध्यमातून 'जीओ'ने भारतात क्रांती केली. आता क्रिकेटच्या दुनियेतही 'जीओ' उतरलं असून स्टार इंडियाच्या माध्यमातून 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर भारत खेळणार असलेल्या क्रिकेटच्या सर्व मॅचेस आता बघता येणार आहे. क्रिकेट रसिकांसाठी ही आत्तापर्यंतही सर्वात मोठी पर्वणी असणार आहे. जगात तुम्ही कुठेही असलात तरी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आवडची मॅच बघता येणार आहे.

मोबाईलच्या क्षेत्रात क्रांती करणाऱ्या 'जीओ' ने आघाडीच्या स्टार इंडियासोबत यासाठी पाच वर्षांचा करार केला आहे. स्टार इंडियाला क्रिकेटच्या मॅचेसच्या प्रक्षेपणाचा दीर्घ अनुभव आहे तर 'जीओ' हे भारतातलं सर्वाच मोठं आणि वेगवान नेटवर्क आहे. भारतात 'जीओ'धारकांचीही संख्या सर्वात जास्त आहे. त्यामुळे प्रेक्षकांना क्रिकेट मॅचेसचं उत्तम कव्हरेज आणि विश्लेषण 'जीओ'टीव्हीवर बघता येणार आहे.

या मॅचेस बघता येतील

टी-20 मॅचेस

वन डे इंटरनॅशनल मॅचेस

इंटरनॅशनल टेस्ट मॅचेस

बीबीसीआयने प्रायोजित केलेल्या भारतातल्या मॅचेस

भारतात क्रिकेट फक्त खेळलं जात नाही तर त्याची पूजा केली जाते. त्यामुळे भारतातल्या क्रिकेट रसिकांना क्रिकेट आणि खेळांशी संबंधीत उत्तम गोष्टी माफक शुल्कामध्ये आणि उत्कृष्ट दर्जाच्या मिळायलाच पाहिजे आणि 'जीओ' त्यादृष्टीनं काम करत असल्याचं 'जीओ' चे संचालक आकाश आंबानी सांगितलं. तर 'जीओ'च्या मदतीने क्रिकेट रसिकांना अनेक नव्या गोष्टी बघायला मिळतील अशी आशा स्टार इंडियाचे कार्यकारी संचालक आकाश गुप्ता यांनी व्यक्त केली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2018 06:13 PM IST

ताज्या बातम्या