S M L

रिलायंस Jio आणि SBI यांची भागीदारी; ग्राहकांना मिळतील हे फायदे

रिलायंस जियो आणि देशातली सर्वात मोठी बँक स्टेट बैंक ऑफ इंडिया (SBI) यांच्यात भागीदारीचा करण्यात आला.

News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2018 10:54 PM IST

रिलायंस Jio आणि SBI यांची भागीदारी; ग्राहकांना मिळतील हे फायदे

मुंबई, 2 ऑगस्ट : रिलायंस जियो आणि देशातली सर्वात मोठी बँक स्टेट बैंक ऑफ इंडिया (SBI) यांच्यात भागीदारीचा करण्यात आला. 'एसबीआय'च्या ग्राहकांना बँकिंग सेवा पुरविण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे. 'एसबीआय'चा डिजिटल कस्टमर बेस वाढविणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊनच हा डिजीटल भागीदारीचा करार करण्यात आलाय. यामुळे SBI च्या ग्राहकांना डिजिटल बैंकिंग, ई-कॉमर्स यांसह अन्य आर्थिस सुविधा देणारा SBI YONO हा रिलायंसचा MyJio प्लेटफॉर्म राहणार आहे. YONO च्या डिजिटल बँकिंग फिचरला SBI च्या ग्राहकांडून येणाऱ्या अनुभवांवरून MyJio प्लेटफॉर्म तयार केला जाईल.

जियो आणि SBI च्या ग्राहकांना मिळणार Jio Prime चा लाभ

MyJio हा देशातील सर्वात मोठा ओवर-द-टॉप (OTT) मोबाइल एप्लीकेशनपैकी एक असून, लवकरच त्यात SBI आणि जियो पेमेंट बँकेची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही सुविधा रिलायंस जियो अणि SBI च्या ग्राहकांना वापरता येईल. हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, ज्यात Jio Prime रिलायंस रिटेल, जियो, पार्टनर ब्रांडस ग्राहकांना आकर्षक सुविधा देखील पुरवेल. SBI Rewardz आणि Jio Prime यांच्या एकत्रीकरणामुळे ग्राहकांना भरघोस लॉयल्टी रिवार्ड प्राप्त करण्याची संधी मिळणार आहे. तसेच, रिलायंस आणि जियोसह दुसऱ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन पार्टनर्सलासुद्धा या सुविधेचा लाभ मिळेल.SBI, Jio सोबत एक प्रमुख भागीदार म्हणून जोडल्या जाणार आहे. तो नेटवर्क आणि कनेक्टिविटी सॉल्यूशन्स डिजाइन करेल आणि ती ग्राहकांना उपब्ध करून दिली जाईल. शहरी आणि ग्रामीण भागात जियोच्या उच्च दर्जाच्या नेटवर्कमुळे SBI चे वीडियो बँकिंग आणि ऑन-डिमांड ही सुविधा पुरविली जाणार आहे. याव्यतिरीक्त, SBI च्या ग्राहकांना जियो फोनवर स्पेशल ऑफर्स देखी उपलब्ध करून दिले जातील.

या विशेष कराराप्रसंगी स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI ) चे चेयरमन रजनीश कुमार म्हणाले की, 'जगातील सर्वात मोठे नेटवर्क असलेल्या Jio सोबत भागीदारी केल्यामुळे आमचा उत्साह आणखी द्विगुणीत झाला आहे.' तर रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेड चे चेयरमन मुकेश अंबानी म्हणाले की, 'जगात SBI च्या ग्राहक संख्येला तोड नाही. जियो आपल्या रिटेल इकोसिस्टम सोबत सुपीरियर नेटवर्क आणि प्लॅटफॉर्म चा वापर करण्यासाठी कटीबद्ध आहे.'

(डिस्क्लोजर : news18lokmat.com हा नेटवर्क 18 मीडिया आणि इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचा भाग असून या कंपनीची मालकी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची आहे. रिलायन्स जिओसुद्धा याच कंपनीचा भाग आहे)

Loading...
Loading...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 2, 2018 10:54 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close