News18 Lokmat

रिलायन्स इंडस्ट्रीनं दिला एका शेअरवर एक बोनस शेअर

गुंतवणूकदारांना मिळालेल्या या एका बोनस शेअरचा फायदा डिव्हिडंट मिळण्यावर होईल.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 21, 2017 04:02 PM IST

रिलायन्स इंडस्ट्रीनं दिला एका शेअरवर एक बोनस शेअर

21 जुलै : रिलायन्स इंडस्ट्रीच्या 40व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानींनी गुंतवणूकदारांसाठी एक मोठी घोषणा केलीय. त्यांनी एका शेअरवर एका बोनस शेअरची घोषणा केली. याआधीही 1983, 1997 आणि 2009मध्येही अशी घोषणा केली होती.

मुकेश अंबानी म्हणाले, '40 वर्षांत रिलायन्स मोठी इंडस्ट्री बनलीय. टेक्साइल कंपनीपासून अनेक कंपनीमध्ये विस्तार झालाय. 70 कोटींपासून 3.30 लाख कोटींचा टर्नओव्हर झालाय. 40 वर्षांत 4700 टक्क्यांनी वाढ झाली.

गुंतवणूकदारांना मिळालेल्या या एका बोनस शेअरचा फायदा डिव्हिडंट मिळण्यावर होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2017 04:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...