रिलायन्स समूहातील 'आलोक इंडस्ट्रीज' तयार करणार PPE, केवळ 650 रुपयांना मिळणार किट

रिलायन्स समूहातील 'आलोक इंडस्ट्रीज' तयार करणार PPE, केवळ 650 रुपयांना मिळणार किट

रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries)ने या समुहातील टेक्सटाइल आणि फॅब्रिक वस्त्र बनवणारी 'आलोक इंडस्ट्रीज' (Alok Industries) या नवीन कंपनीचे पीपीई बनवणाऱ्या कंपनीमध्ये रुपांतरण केले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 मे : रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries)ने या समूहातील टेक्सटाइल आणि फॅब्रिक वस्त्र बनवणारी 'आलोक इंडस्ट्रीज' (Alok Industries) या नवीन कंपनीचे पीपीई बनवणाऱ्या कंपनीमध्ये रुपांतरण केले आहे. कोरोना व्हायरसच्या संकटकाळात संरक्षणात्मक पीपीई बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्यांची किंमत चीनमधून मागवलेल्या PPE च्या तुलनेत एक तृतीयांश इतकी असेल. गुजरातमधील सिल्व्हासामध्ये आलोक इंडस्ट्रीजच्या मॅन्यूफॅक्चरिंगचे पूनर्वसन करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याठिकाणी केवळ कोव्हिड-19 (COVID-19)शी लढणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी आणि फ्रंटलाइनवर काम करणारे इतर कर्मचारी यांकरता Personal Protective Equipment (PPE) बनवण्यात येणार आहेत.

(हे वाचा-कोरोनाच्या संकटकाळात ऑनलाइन फसवणुकीचा धोका सर्वाधिक, Google-Microsoft चा इशारा)

सूत्रांच्या माहितीनुसार, दररोज एक लाखापेक्षा जास्त पीपीई किट बनवण्याची क्षमता याठिकाणी आहे. बाहेरून आयात केलेल्या पीपीई किट्सची किंमत प्रत्येकी 2000 रुपये इतकी आहे, मात्र आलोक इंडस्ट्रीजमध्ये बनवण्यात येणाऱ्या किट्सची किंमत जवळपास 650 रुपये म्हणजेच बाहेरून मागवण्यात येणाऱ्या पीपीई किट्सच्या किंमतीपेक्षा 1 तृतीयांश असणार आहे. भविष्यामध्ये या सुविधेचा वापर पीपीई किट्सची निर्यात करण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

(हे वाचा-घरापर्यंत होईल पेट्रोल आणि CNG ची डिलीव्हरी, पेट्रोलियम मंत्र्यांचे संकेत)

रिलायन्सने पीपीई किट तयार करण्यासाठी साधारण 10000 लोकांचे नवीन तांत्रिक टेलरिंग संसाधनं तैनात केली आहेत. याकरता याठिकाणच्या प्लांट आणि प्रकियेचे नव्याने अभियांत्रिकीकरण करण्यातआले आहे. याठिकाणी एप्रिलच्या मध्यात उत्पादनास सुरूवात झाली असून, दरदिवशी 1 लाख पीपीई किट तयार करण्यापर्यंत क्षमता वाढली असल्याची माहिती मिळते आहे. सध्या भारतात 50 लाख पीपीई किट बनवण्यात येत आहेत.  जूनच्या अखेरपर्यंत हा आकडा 2 कोटींपर्यंत जाईल. सिल्व्हासा याठिकाणच्या मॅन्यूफॅक्चरिंग मधील सूत्रांच्या माहितीनुसार, याठिकाणी बनणारे किट हे 'सिंगल पिस झिप-अप' असून पूर्णपणे आच्छादन करणारे आहे.

First published: May 31, 2020, 1:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading