RIL उघडणार डिजिटल बिझनेससाठी नवी उपकंपनी; रिलायन्स जिओच्या डिजिटल सेवांना मिळणार फायदा

रिलायन्स इंडस्ट्रीजने त्यांच्या डिजिटल बिझनेससाठी एक स्वतंत्र उपकंपनी निर्माण करायचा निर्णय घेतला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 25, 2019 11:11 PM IST

RIL उघडणार डिजिटल बिझनेससाठी नवी उपकंपनी; रिलायन्स जिओच्या डिजिटल सेवांना मिळणार फायदा

मुंबई, 25 ऑक्टोबर : रिलायन्स इंडस्ट्रीजने त्यांच्या डिजिटल बिझनेससाठी एक स्वतंत्र उपकंपनी निर्माण करायचा निर्णय घेतला आहे. 1.08 लक्ष कोटी एवढ्या मूल्याची गुंतवणूक त्यात होईल. या कंपनीमुळे जिओच्या कर्जाचा भार कमी होईल.

रिलायन्सच्या छत्राखाली निर्माण होणाऱ्या या नव्या डिजिटल उपकंपनीत जिओचे सगळे डिजिटल बिझनेस समाविष्ट होतील. RIL ची 65000 कोटींची इक्विटी इन्व्हेस्टमेंटही यात समाविष्ट होईल. यामुळे डिजिटल बिझनेसमधली गुंतवणूक 1.73 लाख कोटींवर जाईल.

रिलायन्स जिओवरच्या कर्जाचा भार या निर्णयामुळे हलका होणार आहे. 31 मार्च 2020 पर्यंत रिलायन्स जिओ कर्जमुक्त होऊ शकते.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले, "या नव्या कंपनीमुळे डिजिटल सेवांना एक वेगळं व्यासपीठ मिळेल. यामुळे भविष्यात अपेक्षित स्ट्रॅटेजिक पार्टनर्स मिळवण्यातही फायदा होईल."

रिलायन्स जिओने गेल्या काही काळात घेतलेला हा मोठा आर्थिक आणि औद्योगिक निर्णय मानला जात आहे.

Loading...

=================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 11:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...