नवी दिल्ली 8 ऑगस्ट: देशातल्या आघाडीच्या रिलायन्स समुहाचे संचालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) जगातले चौथे श्रीमंत व्यक्ती झाले आहे. यावर्षी त्यांच्या संपत्तीमध्ये 22 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. Bloomberg Billionaires Index ने दिलेल्या माहितीनुसार अंबानी यांची एकूण संपत्ती ही 80.6 अब्ज डॉलर्स म्हणजेच 6.04 लाख कोटी एवढी झाली आहे. फ्रान्सच्या बेर्नाड अर्नाल्ट (Bernard Arnault) यांना मागे टाकून त्यांनी हे स्थान मिळवलं आहे.
यावर्षी अंबानी यांनी जगातल्या अनेक अब्जाधिशांना मागे टाकलं आहे. त्यात टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क (Elon Musk) और अल्फाबेट इंकचे सह-संस्थापक सर्जी ब्रिन (Sergie Brin) आणि लॅरी पेज (Larry Page) यांचा समावेश आहे. त्याचबरोबर मुकेश अंबानी यांनी संपत्तीमध्ये जगातले दिग्गज गुंतवणूकदार वॉरने बुफेट (Warren Buffet Net Worth) यांनाही मागे टाकलं आहे.
मार्च 2020 नंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries Limited) शेअर्सनी मोठी उसळी घतली होती. शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 2,146वर बंद झाले होते. हा उच्चांक मानल जातो.
Big News: रविवारी 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार प्रत्येकी 2 हजार
Bloomberg Indexमधल्या जगातल्या पहिल्या 10 अब्जाधिशांमध्ये 8 जण हे अमेरिकेतले आहेत. त्यामुळे अंबानी हे फक्त भारतातलेच नाही तर आशियातलेही सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये जगातल्या आघाडीच्या टेक कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली होती. जगभर आर्थिक मंदीचं वातावरण असताना जिओ ही गुंतवणूक खेचून आणण्यात यशस्वी ठरला. ही गुंतवणूक म्हणजे एक विक्रमच मानला जातो.
देशाच्या विकासासाठी मोदींचं पाऊल; आता 'भारत छोडो' अभियान करणार जलद
भारतातलं डिजिटल नेटवर्क वाढण्यासाठी या गुंतवणूकीचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीही या वाढीचा उपयोग होणार असल्याचंही मुकेश अंबानी यांनी सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.