मुंबई, 26 जुलै : रिलायन्स फाउंडेशनकडून
(Reliance Foundation) समूहातील सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचं (
Employees and family members) लसीकरण (
Vaccination) करण्याची मोहिम वेगाने सुरु असल्याचं सिद्ध झालं आहे. आतापर्यंत कंपनीचे कर्मचारी आणि कुटुंबीय अशा एकूण 10 लाख (
10 lakh) जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत.
काय होतं उद्दिष्ट?
रिलायन्स फाउंडेशन वतीनं एप्रिल महिन्यात या मिशनची घोषणा करण्यात आली होती. कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी कार्यक्रमानुसार ‘मिशन व्हॅक्सिन सुरक्षा’ हा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. रिलायन्स परिवारातील सर्व कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि ग्रुपशी संबंधित 98 टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
कंपनीच्या 98 टक्के कर्मचाऱ्यांना लशीचा किमान एक डोस देण्यात आला आहे. कंपनीच्या JioHealthHub या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लसीकरणासाठी ऑनलाईन बुकिंग, स्लॉट बुक करणे आणि इतर प्रक्रिया सुरळीत पार पडत असल्याचं सांगण्यात आलं आहे. या उपक्रमामुळे ग्रुपच्या कर्मचाऱ्यांचं आरोग्य सुरक्षित होईलच, शिवाय सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासही मदत होणार आहे.
हे वाचा -
पावसाचा फटका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याहून Back To मातोश्री बंगला
रिलायन्स परिवारात ही मोहिम यशस्वीपणे राबवल्यानंतर आता देशपातळीवर ही मोहिम राबवणं गरजेचं असून भारतीय म्हणून आपलं ते कर्तव्य असल्याची भावना रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी व्यक्त केली. आपण सर्वांनी एकत्र येत कोरोनाच्या संकटावर मात करायला हवी. त्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी आपण नेहमीच सज्ज असून लवकरच ते उद्दिष्टही साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.