'आदर्श शिक्षक' घडविण्यासाठी 'रिलायन्स फाऊंडेशन टिचर अवॉर्ड'

'आदर्श शिक्षक' घडविण्यासाठी 'रिलायन्स फाऊंडेशन टिचर अवॉर्ड'

आदर्श शिक्षक घडविण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनने अभिनव उपक्रम सुरू केलाय. तो उपक्रम आहे 'रिलायन्स फाऊंडेशन टिचर अवॉर्ड'

  • Share this:

मुंबई, ता. 22 नोव्हेंबर : देशाचं भविष्य खऱ्या अर्थानं अवलंबुन असतं ते गुणवाण विद्यार्थ्यांवर. आणि विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी गरज असते उत्तम शिक्षकांची. त्यामुळं आदर्श शिक्षक घडविण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनने अभिनव उपक्रम सुरू केलाय. तो उपक्रम आहे 'रिलायन्स फाऊंडेशन टिचर अवॉर्ड'. अशा प्रकारचे पुरस्कार देण्याचं फाऊंडेशनचं हे चवथं वर्ष आहे.

या उपक्रमासाठी रिलायन्स फाऊंडेशनने Centre for Teacher Accreditation (CENTA) या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. CENTA ने यासाठी Teaching Professionals Olympiad (TPO) ही स्पर्धा तयार केली असून त्याचा वर्षभराचा खास अभ्यासक्रमही तयार केलाय. या उपक्रमाचा रिलायन्स फाऊंडेशन मुख्य प्रायोजक असून CENTA ही संस्था हा उपक्रम राबवणार आहे.

या चवथ्या पुरस्कारासाठी 8 डिसेंबरला देशपातळीवर स्पर्धा होणार असून देशातल्या 46 शहरांमध्ये त्याचबरोबर दुबई आणि अबुधाबीमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. Teaching Professionals Olympiad (TPO) मध्ये अभ्यासक्रमाचे 21 ट्रॅक्स तयार करण्यात आले आहेत.

यातले काही अभ्यासक्रम मराठी, हिंदी, तेलुगू, कन्नड, तमिळ भाषेतही उपलब्ध आहेत. TPO चा अभ्यासक्रम उत्तमपणे राबविणाऱ्या तब्बल 1 हजार शिक्षकांची यासाठी निवड केली जाणार आहे. विजेत्या शिक्षकांना रोख पुरस्कार आणि प्रशस्तीपत्र दिलं जाणार आहे.

या उपक्रमावषयी बोलताना रिलायन्स फाऊंडेशनच्या संचालिका ईशा अंबानी म्हणाल्या देशातल्या शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी फाऊंडेशनचा हा अभिनव उपक्रम आहे. उत्तम शिक्षक घडावे आणि शिक्षकांनी उत्तम विद्यार्थी घडवावेत हेच रिलायन्स फाऊंडेशनचं मुख्य उद्दीष्ट आहे.

 

First published: November 22, 2018, 9:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading