मुंबई, 16 फेब्रुवारी : जम्मू-काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आता रिलायन्स फांऊडेशन पुढे आले आहे. यासंबंधी रिलायन्स फांऊडेशनने प्रेस रिलीज जारी केलं.
'देशाचा नागरिक आणि एक व्यावसायिक असल्या नाते आम्ही सुरक्षा दलांच्या आणि सरकारच्या पाठीशी खंभीर उभे आहोत. शहीदांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, रिलायन्स फांऊडेशन त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि रोजगाराची पूर्ण जबाबदारी घेतं आहे. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाच्या आजीविकेचीही जबाबदारी रिलायन्स फांऊडेशन घेत आहे'
गुरुवारी जम्मू काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये भारताने 42 सीआरपीएफचे जवान गमावले. त्याचा आक्रोश म्हणून फांऊडेशनसह या घटनेवर 1.3 अरब भारतीयांकडून मोठा आक्रोश व्यक्त करण्यात आला.
रिलायन्स फांऊडेशन म्हटलं आहे की, 'जगातली कोणतीही ताकद भारताची एकता संपवू शकत नाही आणि माणूसकीच्या शत्रूंना आणि दहशतवाद्यांना हरवण्यासाठी आम्ही कधीच कमी पडणार नाही.'
यात ते पुढे म्हणाले की, 'शोकच्या या वेळी आम्ही शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या सोबत आहोत. हा देश शहीदांच्या बलिदानाला आणि शौर्याला कधीच विसरणार नाही. जे जवान या हल्ल्यामध्ये जखमी झाले ते लवकर बरे व्हावेत याची आम्ही प्रार्थना करतो. गरज पडल्यास जवानांवर आमच्या रुग्णालयात उपचार केले जातील. जवानांच्या प्रति आपल्या कर्तव्यांना समजलं पाहिजे. त्यासाठी आम्ही सरकारला मदत करण्यासाठी तयार आहोत.'
दरम्यान, रिलायन्स फांऊडेशन हा रिलायंस इंडस्ट्रीज् लिमिडेटचा हिस्सा आहे. देशाच्या विकासाची आव्हानं हाताळण्यासाठी आणि त्यावर कायमस्वरुपी उपाय शोधून काढण्यासाठी आम्ही एक प्रेरणादायी भूमिका बजावतो. रिलायन्स फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष, नीता अंबानी आहेत.