Reliance Foundation: रिलायन्स फाउंडेशनतर्फे उत्तराखंडला 5 कोटींचा कोविड मदत निधी

Reliance Foundation: रिलायन्स फाउंडेशनतर्फे उत्तराखंडला 5 कोटींचा कोविड मदत निधी

रिलायन्स फाउंडेशनतर्फे (Reliance Foundation covid care facility) यापूर्वी मुंबईत आणि गुजरातमध्ये कोरोना रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणावर मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 12 मे: रिलायन्स फाउंडेशनने (Reliance Foundation) कोविड काळात (Coronavirus pandemic india) आणखी एका राज्याला मदतीचा हात पुढे केला आहे. मुंबईत शेकडो रुग्णांसाठी सुविधा निर्माण केल्यानंतर जामनगरमध्ये कोविड केअर सेंटर आणि ICU बेड्सची जबाबदारी रिलायन्स फाउंडेशनने उचलली होती. आता उत्तराखंड सरकारला रिलायन्स फाउंडेशनने 5 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

कोरोना साथीत लढण्यासाठी मदत म्हणून RF कडून ही मदत देण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांना लिहिलेल्या पत्रात रिलायन्स फाउंडेशनने असं म्हटलं आहे की, "कोविड साथीच्या अवघड काळात उत्तराखंड सरकार अविरत मेहनत करत जनतेला सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करत आहे. कोविड रिलीफच्या कामाला मदत म्हणून RF सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (‘Uttrakhand State Disaster Management Authority ) 5 कोटी रुपयांची मदत करत आहे. "

"आपण सगळे मिळून एक देश म्हणून कोरोनाविरुद्ध लढू", असं रिलायन्स फाउंडेशनतर्फे उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात अनंत अंबानी यांनी म्हटलं आहे.

मुंबईनंतर Reliance Foundation ची गुजरातमध्ये मोठी मदत; कोरोनारुग्णांना मोफत देणार 1000 बेड्सची सोय

 उत्तराखंड या हिमालयाच्या कुशीतल्या छोट्या राज्यात बुधवारी 7120 नवे कोरोना रुग्ण आढळले. 118 जणांचा मृत्यू झाला. या राज्यात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट अधिक आहे. देशभरात कोरोना साथीने उच्चांक गाठला आहे. काही शहरांमध्ये नवे कोरोना रुग्ण कमी होत असले तरी छोट्या राज्यात मात्र ही साथ बळावत आहे.

रिलायन्स फाउंडेशनतर्फे (Reliance Foundation covid care facility in Jamnagar) यापूर्वी मुंबईत कोरोनारुग्णांसाठी ऑक्सिजन बेड, ICU सुविधांसह वैद्यकीय मदत सुरू करण्यात आली. आता गुजरातमध्येही Reliance Foundation च्या वतीने कोविड रुग्णांसाठी 1000 बेड्सची सुविधा देण्यात आली आहे. कोरोना रुग्णांना रिलायन्सच्या वतीने मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात येत आहेत.

RF ने मुंबईत कोरोना रुग्णांसाठीची सुविधा (Covid care centre Reliance) 827 बेड्स पर्यंत वाढवायचा निर्णय घेतला. त्यानंतर गुजरातच्या जामनगरमध्ये कोविड केअर सेंटरच्या सुविधा देण्यात आली. जामनरच्या गव्हर्नमेंट डेंटल कॉलेजमध्ये तातडीने 400 बेड्सच्या कोविड केअर सेंटरसाठी सुविधा दिल्या जातील. उपचारांचा सगळा खर्च रिलायन्स फाउंडेशनतर्फे केला जाईल. सौराष्ट्रातल्या नागरिकांना याचा फायदा होईल.

First published: May 12, 2021, 5:01 PM IST

ताज्या बातम्या