चेन्नई, 6 मार्च : लोकसभा निवडणुकांची वेळ साधून अण्णाद्रमुक आणि पीएमके या पक्षांनी राजीव गांधींच्या ७ मारेकऱ्यांना सोडण्याची मागणी केल्यामुळे नरेंद्र मोदी अडचणीत सापडले आहेत. मोदींच्या चेन्नई दौऱ्यात त्यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेवण्याचा निर्णय या पक्षांनी घेतला आहे.
तामिळनाडूतल्या लोकांच्या भावना लक्षात घेऊन या सात जणांना सोडण्यात यावं, अशी भूमिका या मित्रपक्षांनी घेतली आहे. हा निर्णय घेतला तर भाजपच्या तामिळनाडूमधल्या महाआघाडीला याचा फायदा होऊ शकेल, अशीही माहती सूत्रांनी दिली आहे.
राजीव गांधींच्या हत्येप्रकरणी ‘एलटीटीई’ चे नलिनी आणि मुरुगन यांच्यासह सात जण दोषी आढळल्यानंतर त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आहे.
सरकार राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडेल, अशी आम्हाला आशा आहे आणि म्हणूनच आम्ही थेट पंतप्रधानांना ही विनंती करणार आहोत, असं पीएमके चे खासदार अंबुमणी रामदास यांनी म्हटलं आहे. या मारेकऱ्यांना सोडलं जाईल , असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अण्णाद्रमुकशी युती करण्याआधी आम्ही राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या सुटकेची मागणी केली होती, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
सरकारने या ७ जणांची सुटका केली नाही तर तामिळनाडूचं सरकार त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेईल, असा इशारा जयललिता यांनी याआधी दिला होता. त्यांच्या निर्णयाला यूपीए सरकारने कोर्टात आव्हान दिलं होतं.जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षासोबतच पीएमके ने ही मागणी लावून धरल्याने भाजपसमोर पेच निर्माण झाला आहे.
VIDEO : 'बसंती' साठी तो पुलावर चढला, 'विरू'गिरी करणाऱ्या तरुणाला असं वाचवलं