मराठी बातम्या /बातम्या /देश /

अर्धनग्न VIDEO मुळे गुन्हा दाखल झाल्यावर रेहाना म्हणते, 'मी अटकेला नाही घाबरत!'

अर्धनग्न VIDEO मुळे गुन्हा दाखल झाल्यावर रेहाना म्हणते, 'मी अटकेला नाही घाबरत!'

या सर्व प्रकरणाबाबत रेहाना फातिमाने असे उत्तर दिले आहे की, तिला अटक होईल याची भीती नाही आहे. आणि या सर्व प्रकारापासून पळून जाण्याचा प्रयत्न देखील ती करणार नाही

कोची, 26 जून : केरळमधील महिला कार्यकर्ती रेहाना फातिमा युट्यूबवर अर्धनग्न व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे अडचणीत आली आहे. तिच्याविरोधात पॉस्को आणि आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच चाइल्ड राइट्स कमिशनने देखील तक्रार दाखल केली आहे.

तिने तिच्या मुलांसमोर अर्धनग्न होत त्यांना स्वत:च्या शरिरावर पेंटिंग करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे रेहाना विरोधात थिरुवल्ला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कार्यवाही केली आहे. पोलिसांनी सेक्शन आयटी कायद्याच्या 67 अंतर्गत (इलेक्ट्रॉनिक मार्गाने लैंगिक कंटेट प्रसिद्ध करणे) आणि जुवेनाइल जस्टिस कायद्याच्या सेक्शन 75 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार यासंदर्भात थिरुवल्ला येथील वकील अरुण प्रकाश यांनी तक्रार दाखल केली होती.

(हे वाचा-मोदी सरकारच्या योजनेमुळे लाखो तरुण होतील स्वावलंबी; 15000 कोटींचा दिला निधी)

या सर्व प्रकरणाबाबत रेहाना फातिमाने असे उत्तर दिले आहे की, तिला अटक होईल याची भीती नाही आहे. आणि या सर्व प्रकारापासून पळून जाण्याचा प्रयत्न देखील ती करणार नाही. यातून कोणतही उत्पन्न मिळवण्याचा माझा मानस नव्हता. नियम पाळूनच यूट्यूबवर व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. लैगिंक शिक्षणाचे धडे घरापासून देण्यात आले पाहिजे, या संकल्पनेचा प्रसार करत असल्याची प्रतिक्रिया रेहानाने न्यूज 18 शी बोलताना दिली आहे.

(हे वाचा-मुंबईत झालेले 'ते' 1000 मृत्यू का दडवले? फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना विचारला जाब)

रेहाना फातिमाने हा व्हिडीओ शेअर करताना 'बॉडी आर्ट आणि राजकारण' (Body Art and Politics) असं कॅप्शन दिले आहे. यामध्ये तिची दोन्ही मुलं तिच्या अर्धनग्न शरिरावर पेंटिंग करत आहेत. पोस्टबाबत फातिमाचे असे म्हणणे आहे की, लैंगिकतेच्या चुकीच्या संकल्पनेविरोधात तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. VIDEO

First published:

Tags: Rehana fahatima