मराठी बातम्या /बातम्या /देश /

राष्ट्रपतीपद निवडणूक : 'या' तिघांच्या भूमिकेवर अवलंबून असेल एनडीए, यूपीएच्या मतांचं गणित

राष्ट्रपतीपद निवडणूक : 'या' तिघांच्या भूमिकेवर अवलंबून असेल एनडीए, यूपीएच्या मतांचं गणित

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा (Presidential Election) कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे देशातल्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा (Presidential Election) कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे देशातल्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा (Presidential Election) कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे देशातल्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे.

नवी दिल्ली, 16 जून : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा (Presidential Election) कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे देशातल्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्ष चर्चा, बैठका, संख्याबळाची जुळणी, व्यूहरचना आखणं आदी गोष्टींवर भर देत आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचा विचार करता एनडीए (NDA) बहुमताच्या (Majority) जवळ असल्याचं बोललं जात आहे. विरोधी पक्षदेखील (Opposition Party) आपली स्थिती मजबूत असल्याचं सांगत आहेत. परंतु, वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. या दोघांकडेही पुरेसं बहुमत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे ही निवडणूक यूपीए (UPA) आणि एनडीएसाठी सोपी नाही. त्यामुळे दोघांकडूनही छोट्या प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यात नवीन पटनायक, के. चंद्रशेखर राव अर्थात केसीआर आणि जगनमोहन रेड्डी या तीन जणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. हे तिघं नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कारण या तिघांच्या भूमिकेवरच राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची सर्व गणितं अवलंबून आहेत. याविषयी माहिती देणारं वृत्त `दैनिक भास्कर`ने दिलं आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी 29 जूनला उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. 18 जुलैला मतदान होणार असून, 21 जुलैला मतमोजणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एनडीए आणि यूपीए संख्याबळाचं गणित जुळवण्यात व्यग्र आहेत. परंतु, एकूण स्थिती पाहता या दोघांसाठीही ही निवडणूक (Election) सोपी नक्कीच नाही. त्यात जगनमोहन रेड्डी, नवीन पटनायक आणि केसीआर काय भूमिका घेतात यावर संपूर्ण निवडणुकीचं गणित अवलंबून असेल. एनडीएला बहुमतासाठी 13 हजार मतांची गरज आहे. त्यामुळे रेड्डी किंवा पटनायक या दोघांपैकी एकाचा पाठिंबा एनडीएला मिळाला, तर ते विजयी होऊ शकतात. 2017मध्ये या दोघांनी एनडीएला पाठिंबा दिला होता. (गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांचा विचार बदलला, वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय) 2017मधल्या समीकरणांचा विचार करता या वेळी ती काहीशी बदलेली आहेत. 2017मध्ये भाजपसोबत (BJP) शिवसेना (Shivsena) आणि अकाली दल यांसारखे पक्ष होते. आता महाराष्ट्र, तमिळनाडू आणि झारखंड या राज्यांत भाजपचं सरकार नाही. राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही भाजपची सत्ता नाही. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात आता भाजप आमदारांची संख्या घटलेली आहे. तमिळनाडूत एआयडीएमके सत्तेतून बाहेर पडला आहे. 2017मध्ये 21 राज्यांमध्ये एनडीचं सरकार होतं. आता 17 राज्यांमध्ये एनडीएचं सरकार आहे. त्यामुळे एनडीएला ही निवडणूक तशी सोपी नाही. आकडेवारीवर दृष्टिक्षेप टाकता एकूण मतांचं मूल्य 10,98,903 आहे. विजयी होण्यासाठी 5,49,452 मतांची गरज आहे. एनडीएकडे सुमारे 5.45 लाख मतं आहेत. यूपीएकडे सुमारे 2.60 लाख, तर अन्य पक्षांची मतं सुमारे 2.93 लाख आहेत. ही आकडेवारी पाहता, नवीन पटनायक, केसीआर आणि जगनमोहन रेड्डी यांची भूमिका या निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Chief Minister Naveen Patnaik) यांना विरोधी पक्षांच्या वतीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Minister Mamata Banerjee) यांनी आमंत्रण दिलं आहे. दुसरीकडे भाजपचे वरिष्ठ नेते अश्विनी वैष्णव यांना पटनायक यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 2012, 2017 प्रमाणेच 2022 च्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी नवीन पटनायक यांचं महत्त्व वाढलं आहे. त्यांच्याकडे 30 हजारांपेक्षा अधिक मतं आहेत. 2012 च्या निवडणुकीत नवीन पटनायक यांनी सुचवल्यानुसार एनडीएनं पी. ए. संगमा यांना उमेदवारी दिली होती; मात्र यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांच्याकडून संगमा यांना पराभव पत्करावा लागला. 2017 मध्ये पटनायक यांनी रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला होता. पटनायक यांचा बिजू जनता दल (BJD) हा पक्ष यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सहभागी होता. त्यानंतर बीजेडी पक्ष केंद्रात कोणत्याही सरकारमध्ये सहभागी नव्हता. याचाच अर्थ सुमारे 20 वर्षांपासून पटनायक यांची केंद्रीय राजकारणात फारशी भूमिका नसली, तरी त्यांचा सर्व पक्षांशी चांगला समन्वय आहे. त्यामुळे 2022 च्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी नवीन पटनायक कोणती भूमिका घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Chief Minister K. Chandrasekhar Rao) अर्थात केसीआर यांनी अद्याप या निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही; मात्र तेलंगण दौऱ्यावर असताना गृहमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं टीआरएस सरकारवर हल्लाबोल केला, त्यावरून भाजप टीआरएसला सोबत घेण्यापेक्षा काही वेगळा विचार करत असल्याचं दिसतं. रेड्डी आणि पटनायक यांच्या मदतीसह एनडीए विजयाचं अंतर वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Chief Minister Jagan Mohan Reddy) यांच्या वायएसआर कॉंग्रेस (YSR Congress) पक्षाकडे 40 हजारांपेक्षा जास्त मतं आहेत. एनडीएचे प्रमुख नेते जगनमोहन रेड्डी यांच्या संपर्कात आहेत. एनडीएला रेड्डी यांचा पाठिंबा मिळू शकतो; मात्र याबाबत रेड्डींकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि यूपीए मतांचं गणित कशा पद्धतीनं जुळवतात, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
First published:

पुढील बातम्या