मराठी बातम्या /बातम्या /देश /VIDEO : कॉपी करण्यासाठी तयार केली ब्लूटूथ चप्पल; तंत्रज्ञानाचा असा वापर पाहून हैराण व्हाल

VIDEO : कॉपी करण्यासाठी तयार केली ब्लूटूथ चप्पल; तंत्रज्ञानाचा असा वापर पाहून हैराण व्हाल

REET News : या परीक्षेत विद्यार्थ्यांना केवळ चप्पल घालून वर्गात प्रवेश करता येतो. मग काय कॉपी बहाद्दरांनी त्याचा वापर करून कल्पना लढवली.

REET News : या परीक्षेत विद्यार्थ्यांना केवळ चप्पल घालून वर्गात प्रवेश करता येतो. मग काय कॉपी बहाद्दरांनी त्याचा वापर करून कल्पना लढवली.

REET News : या परीक्षेत विद्यार्थ्यांना केवळ चप्पल घालून वर्गात प्रवेश करता येतो. मग काय कॉपी बहाद्दरांनी त्याचा वापर करून कल्पना लढवली.

बीकानेर, 26 सप्टेंबर : रीट (REET News) परीक्षेतील कॉपी (Exam Copy) रोखण्यासाठी पोलीस विभागाकडून वारंवार कारवाई करीत आहेत. मात्र असे असतानाही परीक्षा पास करण्यासाठी कॉपी करणाऱ्यांची काही कमी नाही. जोधपूरमध्ये डमी विद्यार्थ्यांच्या टीमनंतर आता बिकानेरमध्ये (Bikaner Exam Fraud) चप्पलमधून कॉपी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही टोळी चप्पलच्या मदतीने नीट परीक्षेत कॉपी करीत असल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणात बिकानेर पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलं आहे. (Bluetooth slippers made for copy)

असं करीत होते चप्पलमधून कॉपी..

रीट परीक्षेत सरकारकडून जारी गाइडलाइन्सनुसार विद्यार्थ्याला केवळ चप्पल (इतर कोणतीही वस्तू बाळगण्यास परवानगी नाही) घालून प्रवेश दिला जातो. अशात या टोळीने चप्पलच्या माध्यमातून कॉपी करण्याचा प्लान आखला. या चप्पलमध्ये एक ब्लूटूथ डिवाइस लावला. जो सहजपणे विद्यार्थी परीक्षा केंद्रात घेऊन जाऊ शकतो. परीक्षेच्या वर्गात गेल्यानंतर विद्यार्थी हा ब्लूटूथ डिवाइस आपल्या कानात लावतो. हा ब्लूटूथ डिवाइस सेंटरच्या बाहेर बसलेल्या एका व्यक्तीच्या मोबाइलशी कनेक्टेड असतो. जो त्याला कॉपी करण्यास मदत करतो.

चप्पलची किंमत 6 लाख रुपये..

कॉपी करण्यासाठी तयार करण्यात आलेली चप्पलेची किंमत ऐकून हैराण व्हाल. या चपलेची किंमत 6 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

हे ही वाचा-एकाच घरी दोन अधिकारी! गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कन्येनं क्रॅक केली UPSC

शहरात अशा 25 चपलांची विक्री..

बिकानेरचे एसपी प्रीती चंद्र यांनी सांगितलं की, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी सांगितलं की, शहरभरात तब्बल 25 जणांना अशा चपला विकण्यात आल्या आहेत. अशावेळी कोणी कोणी या चपलेची खरेदी केली हे शोधून काढणं पोलिसांसाठी आव्हान आहे.

" isDesktop="true" id="609421" >

अजमेर जिल्ह्याशी संबंधित अपडेट समोर आली असून येथे चपलेच ब्लूटूथ डिवाइस लपवून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला पकडण्यात आलं आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.

First published:

Tags: Exam, Online fraud, Video viral