जेट एअरवेजच्या माजी CEO च्या मुंबईस्थित घरावर रेड, ED ने केली कारवाई

जेट एअरवेजच्या माजी CEO च्या मुंबईस्थित घरावर रेड, ED ने केली कारवाई

काल रात्री अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई करीत नरेश गोयल यांची चौकशी केली

  • Share this:

मुंबई, 5 मार्च : जेट एअरवेजचे (Jet Airways) माजी सीईओ (CEO) नरेश गोयल यांच्या मुंबईस्थित घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) छापा टाकला आहे. मनी लाँड्रिंग (money laundering) प्रकरणात हा छापा टाकण्यात आला आहे. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने नवीन केस दाखल केली आहे. यापूर्वी बुधवारी सकाळी ED ने नरेश गोयल यांना समन्स पाठविले होते.

हा छापा टाकण्यापूर्वी ED ने फेमाअंतर्गत (FEMA) कारवाई करीत दिल्ली व मुंबई येथील 12 ठिकाणांचा तपास केला होता. यामध्ये जेट अधिकाऱ्यांच्या अनेक ठिकाणांचा समावेश आहे. या तपासादरम्यान नरेश गोयल यांच्या 19 कंपन्यांची माहिती मिळाली होती. यापैकी 5 कंपन्यांची परदेशात नोंदणी करण्यात आली आहे. यासह संशयास्पद व्यवहाराद्वारे परदेशात पैसे पाठवून पैशांचा गैरवापर केल्याची माहितीही मिळाली आहे. ED ने छाप्यादरम्यान परदेशी कंपन्यांसोबत केलेल्या व्यवहाराची कागदपत्रे आणि डिजिटल स्वरुपातील पुरावे ताब्यात घेतले आहेत.

हे वाचा - आई, मी खूप अभ्यास करीन आणि मोठी अधिकारी बनेल, नको ना सोडून जाऊ आम्हाला'

नरेश गोयल अप्रत्यक्ष स्वरुपात परदेशातील अनेक कंपन्यांवर नियंत्रण ठेवून असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्यामध्ये अनेक ‘टॅक्स हॅवन’ देशांचा समावेश आहे. सुरुवातीच्या तपासात ही गोष्ट समोर आली होती की, नरेश गोयल यांनी टॅक्स वाचविण्यासाठी देशातील व परदेशी कंपन्यांमध्ये अनेक संदिग्ध व्यवहार केले आहेत आणि हे पैसे देशाबाहेर पाठविले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता ED ने नरेश गोयल यांच्याविरोधात नवीन केस दाखल केली आहे. ED चे मुख्य अधिकारी बुधवारी रात्री नरेश गोयल यांच्या मुंबईस्थित घरी पोहोचले. तपासादरम्यान ED च्या अधिकाऱ्यांनी नरेश गोयल यांची चौकशी केली. मनी लाँड्रिंग प्रकरणात हा छापा टाकण्यात आला होता.

हे वाचा - PNB सह 10 बँकांच्या विलीनीकरणाला मंजूरी, ग्राहकांच्या खात्यावर होणार हे परिणाम

काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी नरेश गोयल व त्यांची पत्नी अनिता यांच्याविरोधात एका ट्रॅव्हल कंपनीने 46 कोटी रुपयांचा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. अकबर ट्रॅव्हल्स ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य वित्त अधिकारी राजेंद्रन नेरुपरमबिल यांनी ही तक्रार दाखल केली होती. ही कंपनी 1994 पासून जेट एअरवेजसोबत काम करीत आहे. तक्रारदारांचे म्हणणे आहे की, आरोपींनी आपल्या कंपनीवर असलेले आर्थिक संकट लपवले आणि अकबर ट्रॅव्हल एजन्सीला कोणतेही नुकसान होणार नसल्याचं आश्वासन दिलं. या ट्रॅव्हल एजन्सीने आरोपीने दिलेल्या आश्वासनावरुन अत्यंत स्वस्त दरात मॅनचेस्टर-मुंबई हवाई वाहतुकीची तिकीटं विकली. 2019 मध्ये अनेक जेट हवाई वाहतूक रद्द करण्यात आली होती. ज्यामुळे ट्रॅव्हल कंपनीला मोठं नुकसान झालं मात्र जेटकडून ही नुकसान भरपाई देण्यात आली नसल्याचा आरोप ट्रॅव्हल कंपनीच्या वित्त अधिकाऱ्यांनी केला आहे.

First published: March 5, 2020, 8:27 AM IST

ताज्या बातम्या