नवी दिल्ली, 11 मार्च : सोन्याच्या दराने (Gold Price) आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. आजचा दर सगळ्यात जास्त असून तो 44 हजार 920 रुपये तोळा इथपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या सोनेखरेदीवर संक्रांत येण्याची शक्यता आहे.
एकीकड़े पेट्रोल-डिझेलचे (Petrol-diesel) दर कमी झाले आहेत, तर दुसरीकडे सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. इतकचं नव्हे तर 25 मार्चला गुढीपाडव्यापर्यंत सोन्याचे दर 50 हजारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या जगभरात कोरोना व्हायरसचा (Corona Virus) फटका बसत आहे. यामुळे आयात-निर्यातीवर मोठी परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे शेअर बाजाराही (Share Market) गडगडला आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. हिंदू सणांनुसार गुढीपाडवा (Gudhipadva) मराठी नववर्ष आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. मात्र सोन्याच्या वाढत्या किमती पाहता येत्या गुढीपाडव्याला सर्वसामान्यांना सोने खरेदी करणे अवघड ठरणार आहे.
संबंधित - सोन्यात गुंतवणूक करून मिळवा मोठा फायदा, 1 रुपयातही 'असं' खरेदी करा Gold
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात (5 फेब्रुवारी) सोन्याच्या किंमतीमध्ये होणारी घसरण झाली होती. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली होती. मागणी घटल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत (Gold Price today) घसरली होती. दिल्लीतील सराफा बाजारात सोनं तब्बल प्रति तोळा 396 रुपयांनी घसरलं होतं. त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रातून कमी झालेल्या मागणीमुळे चांदीच्या किंमतीही घसरल्या. चांदीची किंमत प्रति किलो 179 रुपयांनी कमी झाली होत्या. जगभरातील शेअर बाजारात गुंतवणूक वाढल्यामुळे त्याचा परिणाम सोनेचांदीच्या किंमतीवर होत आहे.
संबंधित - मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी; अंर्तवस्त्रांमध्ये लपवले एक कोटीचे सोनं!
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.