2016मध्ये अन्नधान्य उत्पादनाचा नवा विक्रम

2016मध्ये अन्नधान्य उत्पादनाचा नवा विक्रम

तिसऱ्या आणि अंतिम आढाव्यानुसार, देशामध्ये यंदा २७ कोटी ३३ लाख टन धान्योत्पादन अपेक्षित आहे. उसाचा अपवाद वगळल्यास तांदूळ, गहू, डाळी, तेलबिया उत्पादनाने यंदा नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.

  • Share this:

10 मे : गेल्या वर्षी म्हणजे २०१६ मध्ये झालेल्या दमदार मान्सूनने चालू वर्षांमध्ये अन्नधान्य उत्पादनाचा नवा विक्रम केल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केली. तिसऱ्या आणि अंतिम आढाव्यानुसार, देशामध्ये यंदा २७ कोटी ३३ लाख टन धान्योत्पादन अपेक्षित आहे.  उसाचा अपवाद वगळल्यास तांदूळ, गहू, डाळी, तेलबिया  उत्पादनाने यंदा नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत.

आतापर्यंतचं विक्रमी  धान्य उत्पादन

अपेक्षित अंदाज- 27 कोटी 33 लाख टन

तांदूळ, डाळ, गहू, तेलबिया उत्पादनात नवीन विक्रम

फेब्रुवारीत 27 कोटी 19 लाख टन उत्पादनाचा अंदाज

वाढ होऊन 27 कोटी 33 लाख टनाचा अंदाज

2015-16च्या तुलनेत 8.67 टक्के जास्त उत्पादन

2013-14 मध्ये 26 कोटी 50 टन उत्पादन

धान्यउत्पादनाचा विक्रम

किती वाढ अपेक्षित

तांदूळ- 25 लाख टन

गहू-48 लाख टन

भरड धान्य - 58 लाख टन

डाळी- 60 लाख टन

तेलबिया- 2 लाख टन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2017 12:53 PM IST

ताज्या बातम्या